Five Rajyog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. प्रत्येक ग्रहाच्या स्थितीत होणार बदल देश आणि जगासह 12 राशींवर थेट परिणाम करतो. यातच आता 29 आणि 30 नोव्हेंबरच्या रात्री शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
शुक्राच्या या राशी बदलामुळे तब्बल 700 वर्षांनंतर शुक्र आणि गुरू ग्रह समोरासमोर येणार आहेत. या स्थितीमुळे शश योग, केंद्र त्रिकोण योग, मालव्य योग, नवपंचम योग आणि रूचक योग असे पाच राजयोग बनत आहेत. या राजयोगांचा मोठा लाभ काही राशींना होणार आहे. राजयोगामुळे 2024 मध्ये पुढील चार राशींचं (Zodiac Signs) नशीब पालटणार आहे, त्यांना धनलाभ होईल आणि करिअरमध्येही यश मिळेल.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष अनुकूल असेल. या लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नोकरदार वर्गासाठी हा राजयोग शुभ योग घेऊन येत आहे. गुरू-शुक्र समोरासमोर येण्यामुळे पुढील वर्षी नोकरीत प्रमोशनचा योग आहे. विवाहित लोकांचं जीवन सुखी आणि समाधानी राहील. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. काही जणांना अनपेक्षित आर्थिक लाभाचाही फायदा मिळेल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी 5 राजयोग शुभ ठरणार आहेत. या राशीच्या लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. सामाजिक पद-प्रतिष्ठा वाढेल. नशिबाची भक्कम साथ मिळेल. कामात यश निश्चित आहे. आर्थिक उत्पन्न वाढेल. भावी आयुष्याच्या दृष्टीने तुम्ही आर्थिक बचत देखील कराल.
धनु रास (Sagittarius)
शुक्राच्या राशी बदलामुळे तयार होणारे पाच राजयोग धनु राशीला फलदायी ठरतील. धनु राशीच्या काही जणांना विदेशात नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे, त्या निमित्ताने परदेश वारी घडेल. विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होऊ शकते. गुरू आणि शुक्राच्या कृपेने मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. या योगाच्या प्रभाव फलदायी ठरेल.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी पाच राजयोग आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. नोकरी करत असाल तर पुढील वर्षी तु्मच्या प्रमोशनची शक्यता आहे. मॉडलिंग, अभिनय, संगीत, मीडिया अशा विविध क्षेत्रातील लोकांची या काळात चांगली प्रगती होईल. सरकारी नोकरीत मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर ते प्रयत्न यशस्वी ठरण्याची शक्यता आहे, तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :