February Planets Transit 2024 : फेब्रुवारी महिना नुकताच सुरू झाला आहे, हा महिना ग्रह-ताऱ्यांच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे. या महिन्यात 4 ग्रहांच्या हालचालीत बदल होतील. ग्रहांच्या हालचालींचा या राशींवर मोठा प्रभाव पडेल, जाणून घ्या


 


काही राशींसाठी खूप शुभ तर काहींसाठी त्रासदायक


फेब्रुवारी महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य आपल्या राशी बदलणार आहेत. याच महिन्यात शनिदेवही कुंभ राशीत अस्त करणार आहेत तर सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशी बदलामुळे मकर राशीतही त्रिग्रही योग तयार होणार आहे. ग्रह आणि नक्षत्रांची ही स्थिती काही राशींसाठी खूप शुभ तर काहींसाठी त्रासदायक ठरणार आहे. हा महिना ग्रह-ताऱ्यांच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे. या महिन्यात 4 ग्रहांच्या हालचालीत बदल होतील. चला जाणून घेऊया या राशींबद्दल.


मिथुन



हा महिना ग्रह-ताऱ्यांच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे. या महिन्यात 4 ग्रहांच्या हालचालीत बदल होतील. मिथुन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना काही खास असणार नाही. शनिदेव तुमच्या अनेक कामात अडथळे आणू शकतात. या काळात तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. ग्रहांची दिशा तुमच्यासाठी अनुकूल राहणार नाही. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. या राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागू शकते. तुमचा खर्चही वाढू शकतो.


 


धनु



हा महिना ग्रह-ताऱ्यांच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे. राशीच्या लोकांना फेब्रुवारीमध्ये अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमची नियोजित कामे पूर्ण होणार नाहीत. तुमच्या प्रत्येक कामात काही अडथळे येऊ शकतात. या महिन्यात तुमच्या खर्चात मोठी वाढ होऊ शकते. ग्रहांच्या स्थितीतील बदल तुमच्यासाठी शुभ ठरणार नाहीत. या राशीच्या लोकांना नोकरीतही काही अडचणी येऊ शकतात.



कुंभ



हा महिना ग्रह-ताऱ्यांच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना अनेक समस्या घेऊन आला आहे. या महिन्यात तुम्ही अनेक प्रकारच्या मानसिक तणावातून जाल. सूर्य आणि शनीचा संयोग तुमच्यासाठी खूप त्रासदायक ठरेल. व्यवसायाच्या क्षेत्रात नियोजन करून काम करावे लागेल. नोकरीपासून व्यवसायापर्यंत सर्वच बाबतीत संघर्षाला सामोरे जावे लागेल. जवळच्या व्यक्तीशी तुमचे मतभेद वाढू शकतात. या महिन्यात तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल.


 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Dev : 11 फेब्रुवारीनंतर 3 राशींसाठी शनिदेव आणणार अडचणी; पैसा, नोकरी, व्यवसायात येतील समस्या, काळजी घ्यावी लागेल