February 2025 Vivah Muhurta: हिंदू धर्मात विवाह हा धार्मिक संस्कारांचा एक भाग आहे. या विधीमुळे जीवन सुखी होते अशी मान्यता आहे. हिंदू धर्मात लग्नासारखी शुभ कार्ये मुहूर्तानुसार केली जातात. तुम्हीही पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात लग्नाचे नियोजन करत असाल आणि लग्नासाठी शुभ मुहूर्त शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणाऱ्या लग्नाच्या शुभ मुहूर्तांची यादी देत ​​आहोत. जाणून घेऊया फेब्रुवारी महिन्यातील विवाहाचे शुभ मुहूर्त..

यंदा कर्तव्य आहे?

हिंदू धर्मात वधू-वरांची भेट हे पवित्र मिलन मानले गेले आहे. त्यामुळे समाजात आनंदाचे वातावरण निर्माण होईल, असे सांगितले जाते. हिंदू धर्मात एकूण आठ प्रकारचे विवाह मानले जातात. अनेक तरुण-तरुणी असतील, ज्यांना यंदा विवाह करायचा आहे. ते येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात करू शकतात. हा महिना वर्षातील सर्वात लहान महिना आहे, या महिन्यातील 28 दिवसांमध्ये लग्नासाठी 14 शुभ मुहूर्त आहेत. 

2 फेब्रुवारी 2025, रविवार

शुभ विवाह वेळ 09:14 सकाळी ते 03 फेब्रुवारी 07:08 सकाळी, नक्षत्र : उत्तर भाद्रपद, रेवतीतिथी : पंचमी

3 फेब्रुवारी 2025, सोमवार

शुभ विवाह वेळ 07:08 सकाळी ते 05:40 सायंकाळीनक्षत्र : रेवतीतिथी : षष्ठी

6 फेब्रुवारी 2025, गुरुवार

शुभ विवाह वेळ 07:29 सायंकाळी ते 07 फेब्रुवारी 07:06 सकाळी नक्षत्र : रोहिणीतिथी : नवमी, दशमी

7 फेब्रुवारी 2025, शुक्रवार

शुभ विवाह वेळ 07:06 सकाळी ते 04:17 सायंकाळीनक्षत्र : रोहिणीतिथी : दशमी

12 फेब्रुवारी 2025, बुधवार

लग्नाची शुभ वेळ 01:58 मध्यरात्री ते 13 फेब्रुवारी 07:01 सकाळी नक्षत्र : मघातिथी : प्रतिपदा

13 फेब्रुवारी 2025, गुरुवार

शुभ विवाह वेळ 07:01 सकाळी ते 07:31 सायंकाळीनक्षत्र : मघातिथी : प्रतिपदा

14 फेब्रुवारी 2025, शुक्रवार

शुभ विवाह वेळ 11:09 रात्री ते 15 फेब्रुवारी 06:59 सकाळी नक्षत्र : उत्तरा फाल्गुनीतिथी : तृतीया

15 फेब्रुवारी 2025, शनिवार

शुभ विवाह वेळ 06:59 सकाळी ते 10:48 रात्रीनक्षत्र : उत्तरा फाल्गुनीतिथी : तृतीयादुसरा मुहूर्त: 11:52 रात्री ते 16 फेब्रुवारी 06:59 सकाळी नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी, हस्ततिथी : चतुर्थी

16 फेब्रुवारी 2025, रविवार

शुभ विवाह वेळ 06:59 सकाळी ते 08:06 सकाळीनक्षत्र : हस्ततिथी : चतुर्थी

18 फेब्रुवारी 2025, मंगळवार

लग्नाची शुभ वेळ 09:52 सकाळी ते 19 फेब्रुवारी 06:56 सकाळी नक्षत्र : स्वातीतिथी : षष्ठी

19 फेब्रुवारी 2025, बुधवार

लग्नाची शुभ वेळ सकाळी 06:56 ते 07:32 आहेनक्षत्र : स्वातीतिथी : सप्तमी, षष्ठी

21 फेब्रुवारी 2025, शुक्रवार

लग्नाची शुभ वेळ सकाळी 11:59 ते दुपारी 2:54 अशी आहेनक्षत्र : अनुराधातिथी : नवमी

23 फेब्रुवारी 2025, रविवार

लग्नाची शुभ वेळ दुपारी 01:55 ते 06:43 पर्यंतनक्षत्र : मूलतिथी : एकादशी

25 फेब्रुवारी 2025, मंगळवार

लग्नाची शुभ वेळ सकाळी 08:15 ते संध्याकाळी 06:31नक्षत्र : उत्तराषाढतिथी: द्वादशी, त्रयोदशी

हेही वाचा>>>

Numerology: तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 'हे' अंक असतील तर सावधान! गरिबीकडे वाटचाल, जोडीदाराशी मतभेद? अंकशास्त्रात म्हटलंय...

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )