Jyotish Shastra : आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या दरम्यान घाईमुळे अनेक गोष्टी आपल्या हातातून पडतात. परंतु, आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाही. हातातून वस्तू पडणे हे अगदी सामान्य आहे, परंतु जर काही गोष्टी एकापेक्षा जास्त वेळा पडल्या म्हणजे पुन्हा पुन्हा पडल्या तर ते अशुभ लक्षण मानले जाते. शास्त्रानुसार आपल्यासोबत दिवसभर घडणाऱ्या घटना शुभ आणि अशुभ संकेत सांगतात, त्यामुळे काही गोष्टी हातातून कधीच पडू देऊ नये. विशेषतः पांढर्‍या रंगाच्या वस्तू. कारण स्वतःच्या हातातून पांढऱ्या रंगाची वस्तू पडली तर घरात भांडणे सुरू होतात. एवढेच नाही तर गरिबी आणि पैशाची कमतरता देखील भासते.  


शंख
शंखपूजेमध्ये शंखाचे विशेष महत्त्व आहे . मंदिरात ठेवण्यापूर्वीही काही नियम पाळले जातात. पण वाजवताना हातातून शंख सुटला तर ते घरासाठी चांगले नाही.


दूध


दूध सांगडणे चांगले नाही, त्यामुळे दूध हातातून गळून पडल्यास घरातील मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे चुकूनही दूध सांडू देऊ नका.


नारळ
हिंदू धर्मात नारळाशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. शुभ कार्यादरम्यान हातातून नारळ पडल्यास ते अशुभ असते असे मानले जाते. घरातील प्रसादाचे वाटप करताना हातातून नारळ पडला तर ते खूप हानिकारक आहे.


मीठ
हा अन्नाचा अविभाज्य भाग असला तरी त्याचा नशिबाच्या शुभाशीही संबंध आहे. असे मानले जाते की हातातून मीठ वारंवार पडल्यास त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.


पांढरे तिळ
पांढर्‍या तिळाचा वापर अनेक धार्मिक कार्यात केला जातो. पितरांच्या तर्पणमध्ये तिळाचा वापर केला जातो. तीळातील घटक जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत करतात असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार हातातून तीळ पडणे हे शुभ लक्षण नाही. यामुळे जीवनातील शुभता कमी होते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)  


महत्वाच्या बातम्या


Astrology : 'या' तीन राशीचे लोक मनातील गोष्टी शेअर करत नाहीत 


Dream Astrology : तुम्हालाही 'या' गोष्टी स्वप्नात दिसतात का? भविष्याबद्दल देतात अनेक संकेत 


Kali Mirch Ke Totke : काळ्या मिरीचा छोटासा उपाय जीवनात हजारो आनंद आणेल