Dussehra 2025 Lucky Zodiac Signs : हिंदू पंचांगानुसार, विजयादशमीच्या (Vijayadashmi) दिवसाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. विजयादशमीला दसरा (Dasara 2025) असे देखील आपण म्हणतो. त्यानुसार, दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला विजयादशमीचा उत्सव साजरा केला जातो. त्यानुसार, यंदा 2 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजेच उद्या हा उत्सव साजरा केला जाणार आहे. यावर्षी दसऱ्याच्या दिवशी अनेक शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे काही राशींना चांगला लाभ मिळणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी दसऱ्याचा दिवस अत्यंत शुभकारक असणाप आहे. या काळात तुमच्या नोकरी व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. प्रगतीचे अनेक मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, या कालावधीत तुमच्या घरातील वातावरण देखील प्रसन्न असणार आहे. या काळात तुमची रखडलेली कामे देखील तुम्ही पूर्ण करु शकता. तुमच्या मार्गातील सर्व अडथळे हळुहळू दूर होताना दिसतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी विजयादशमीचा दिवस फार खास असणार आहे. या काळात तुमच्यात अनेक सकारात्मक बदल झालेले दिसतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं बॉसकडून कौतुक केलं जाईल. तसेच, नशिबाची साथ देखील तुम्हाला मिळणार आहे. लवकरच तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या कामात हलगर्जीपणा करु नका. प्रामाणिकपणे तुमची कामे करा. तसेच, वेळेचं भान ठेवा. पैशांचा विनाकारण वापर करु ना.

Continues below advertisement

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ फार भाग्यशाली असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जावं लागू शकतं. या दिवसाची सुरुवात करताना तुम्ही नियोजित केलेल्या वेळी तुमची कामे पूर्ण होतील. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळण्याची शक्यता आहे. तसेच, वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. 

हेही वाचा :                                             

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Mahanavami 2025 : तब्बल 100 वर्षांनंतर महानवमीला जुळून आले 5 दुर्लभ संयोग, आज रात्रीपासून नशीब पालटणार, धनलाभाचे मिळतील संकेत