Mahanavami 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज नवरात्रोत्सवाचा (Shardiya Navratri 2025) नवमीचा दिवस आहे. या दिवशी अनेक शुभ योग तसेच, राजयोग (Rajyog) जुळून येणार आहेत. याचा प्रभाव मानवासह जगभरात दिसून येणार आहे. शास्त्रानुसार, आज महानवमीचा (Mahanavami) दिवस आहे. आजच्या दिवशी 5 दुर्लभ ग्रहांचा संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सूर्य-बुध ग्रहाच्या युतीने बुधादित्य योग निर्माण होणार आहे. या व्यतिरिक्त बुध आपल्या राशीत असल्यामुळे भद्र महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. तसेच, सूर्य-यममुळे नवपंचम आणि शुक्र-गुरुच्या संयोगाने अर्धकेंद्र योग जुळून आला आहे. रवि योगाचा देखील योग आहे. त्यामुळे काही राशींचं (Zodiac Signs) भाग्य बदलण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी 5 ग्रहांचा दुर्लभ संयोग फार लाभदायी ठरणार आहे. कारण भद्र आणि बुधादित्य राजयोग या राशीच्या नवव्या स्थानी असणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळू शकते. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. व्यवसायात तुम्हाला लाभ मिळेल. त्याचबरोबर, कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. या काळात तुम्ही एखादी महागडी वस्तू देखील खरेदी करु शकता. त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
5 ग्रहांचा दुर्लभ संयोग कन्या राशीसाठी फार अनुकूल ठरणार आहे. कारण भद्र आणि बुधादित्य राजयोग या राशीच्या लग्न भावात विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुमच्या कामाच्या शैलीत अनेक चांगले बदल दिसून येतील. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. तसेच, जे लोक विवाहित आहेत त्यांना लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी 5 ग्रहांचा दुर्लभ संयोग फार लाभदायी ठरणार आहे. कारण भद्र आणि बुधादित्य राजयोग या राशीच्या धन स्थानी असणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्यामध्ये चांगला आत्मविश्वास दिसून येईल. पैशांच्या संबंधित तुमच्या समस्या हळुहळू नाहीशा होतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. सकारात्मक देवाण-घेवाण होईल.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)