Dussehra 2024 : देशभरात नवरात्रीचा उत्सव अगदी आनंदात आणि उत्साहात सुरु आहे. नवरात्रीच्या (Navratri 2024) दशमीच्या दिवशी दसरा (Dussehra 2024) साजरा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार, यंदा दसरा येत्या 12 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शनिवारी साजरा केला जाणार आहे. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. 


हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान रामाने रावण आणि देवी दुर्गाने महिषासुराचा वध केला. त्यामुळे या तिथीला विजयादशमीच्या दिवशी साजरे केले जाते. असं म्हणतात की, दसऱ्याच्या शुभ दिवशी काही उपाय केल्यास वर्षभर त्याचा प्रभाव आपल्यावर राहतो. दसऱ्याच्या दिवशी रोग, पैशांची कमतरता, दारिद्र्य आणि कार्यात अडथळा आणि शनीची साडेसाती, ढैय्यासाठी काही उपाय तुम्ही करु शकता. 


रोगांपासून होईल सुटका 


दसऱ्याच्या दिवशी रोगांपासून मुक्ती हवी असल्यास सुंदरकांडचा पाठ करा. याशिवाय, एक नारळ हातात ठेवून हनुमान चालीसा "नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमान बीरा" वाचून रोगीच्या डोक्यावरून हात फिरवा. त्यानंतर नारळाला रावण दहनात फेकून द्या. यामुळे तुमचे आजार दूर होतील. 


हाती घेतलेल्या कार्यात मिळेल यश 


तुमच्या कार्यात यश किंवा कोणत्याही समस्येपासून सुटका हवी असल्यास दसऱ्याच्या दिवशी अपराजिताच्या रोपाची पूजा करा. हे फूल हातात बांधल्यास तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल असं म्हणतात. 


धन-लाभ होईल 


व्यवसायात प्रगती हवी असल्यास दसऱ्याच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र , नारळ, मिठाई यांसारख्या वस्तू ब्राह्मणाला दान करा. यामुळे तुमच्या व्यवसायाला चांगली बरकत येईल. तसेच, तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. 


शनीच्या साडेसातीपासून होईल सुटका 


जर तुमच्या कुंडलीत शनीची साडेसाती  किंवा ढैय्या असेल तर त्यापासून सुटका हवी असल्यास दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली तीळाच्या तेलाने 11 दिवे लावा. आणि प्रार्थना करा. यामुळे शनीची ढैय्या आणि साडेसातीपासून सुटका होईल.


दारिद्र्य होईल दूर 


सर्वात मोठं दान हे गुप्त दान असतं असं म्हणतात. यासाठी दसऱ्याच्या दिवशी गुप्त पद्धतीने ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्रदान करा. यामुळे तुमचे दारिद्र्य दूर होईल. तसेच, घरात वातावरही प्रसन्न राहील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Shardiya Navratri 2024 : आसुरी शक्तींचा नाश करणारी देवी कालरात्री; महासप्तमीला 'अशी' करा देवीची पूजा, मनातील इच्छा होतील पूर्ण