Dog in Dream : झोपल्यावर स्वप्न (Dream) पडणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा परिणाम माणसाच्या वास्तविक जीवनावरही होतो. काही स्वप्नं शुभ संकेत देतात, तर काही स्वप्नं अशुभ संकेत देतात. विज्ञानानुसार, प्रत्येक स्वप्नाला काही ना काही अर्थ असतो. कधीकधी आपण झोपण्यापूर्वी ज्याचा विचार करत असतो, त्यांचं स्वप्न आपल्याला पडतं, आपण ज्याचा विचार करतो ते आपल्याला स्वप्नात दिसतात. अशा प्रकारेच, स्वप्नात प्राणी आणि पक्षी दिसणं देखील स्वाभाविक आहे. विविध प्रकारचे स्वप्न आपल्याला विविध संकेत देत असतात. त्याच प्रमाणे, स्वप्नात कुत्रा (Dog in Dreams) दिसण्याचा अर्थ काय? आणि हे शुभ मानावं की अशुभ? जाणून घेऊया.


स्वप्नात कुत्रा दिसणे


काही लोकांना स्वप्नात स्वतःचे पाळीव प्राणी दिसतात. जर तुम्हाला स्वप्नात कुत्रा दिसला तर त्याचा विशिष्ट अर्थ असतो. स्वप्नात कुत्रा दिसणं हे एक शुभ लक्षण मानलं जातं. परंतु, स्वप्नात कुत्रा कोणत्या स्थितीत दिसला हे देखील तितकंच महत्त्वाचं समजलं जातं. स्वप्नात दिसणाऱ्या कुत्र्याच्या वेगवेगळ्या पोझिशन्स काही गोष्टींचे संकेत देतात.


स्वप्नात काळा कुत्रा दिसणे


काळा कुत्रा शनि ग्रहाशी संबंधित आहे. जर तुम्हाला स्वप्नात काळा कुत्रा दिसला तर याचा अर्थ तुमच्यावर शनिदेव आणि कालभैरवाचा आशीर्वाद आहे. स्वप्नात काळा कुत्रा येणं हा एक शुभ संकेत आहे. पण स्वप्नात जर काळा कुत्रा रागवलेला असेल किंवा सतत भुंकत असेल तर ते अशुभ असू शकतं.


कुत्रा तुमच्या दिशेने चालत येताना दिसणे


जर तुमच्या स्वप्नात कुत्रा तुमच्या दिशेने चालत असेल तर याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता. याशिवाय याचा अर्थ असाही होतो की, तुम्ही आयुष्यात खूप एकटे आहात आणि तुम्हाला एखाद्या जोडीदाराची गरज आहे.


स्वप्नात रागावलेला कुत्रा दिसणे


जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात रागावलेला कुत्रा दिसला तर याचा अर्थ असा की, ज्या व्यक्तीवर तुमचा विश्वास आहे तो लवकरच तुमचा विश्वासघात करणार आहे. तुमचा त्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो, तो व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकतो.


स्वप्नात पिसाळलेला कुत्रा दिसणे


जर तुम्हाला स्वप्नात पिसाळलेला कुत्रा किंवा वेडा कुत्रा दिसला तर याचा अर्थ असा की, तुम्हाला काही कामात यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. जर विद्यार्थ्यांना स्वप्नात वेडा कुत्रा दिसला तर याचा अर्थ असा की, तुम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची तीव्र गरज आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Vastu Shashtra : वास्तुशास्त्रात दिशांचे महत्त्व काय आहे? जर तुम्हाला माहित नसेल तर येथे जाणून घ्या...