Diwali 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या तिथीला दिवाळी (Diwali 2025) साजरी करतात. त्यानुसार आज दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजेच भाऊबीजेचा दिवस आहे. दिवाळीच्या रात्री धनदेवता देवीची पूजा केली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, अनेक राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीची (Goddess Lakshmi) कृपा असते. देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-संपत्तीत चांगली भरभराट होते. त्यानुसार, दिवाळीनंतरचा काळ कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
ज्योतिष शास्त्राप्रमाणे, वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र देव आहे. या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या सगळ्या आर्थिक समस्या दूर होतील. धनसंपत्तीत चांगली वाढ होईल. तसेच, शुभ कार्यात चांगलं यश मिळेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. तुमच्या कामकाजात चांगली वाढ होईल. तसेच, तुमची तणावातून मुक्ती होईल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या स्वामी ग्रह शुक्र आहे. या राशीवर देखील देवीची कृपा असणार आहे. तसेच, तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असाल. तसेच, जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी देखील दिवाळीनंतरचा काळ फार लाभदायक ठरणार आहे. या काळात ग्रहांची स्थिती शुभ असल्या कारणाने तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुम्ही करत असलेल्या कामकाजात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी देखील हा काळ फार उत्सुकतेचा असणार आहे. मनासारखं काम करता आल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :