Laxmi Pujan 2024 Lucky Zodiacs : दरवर्षी आश्विन महिन्यातील अमावास्येला दिवाळी हा पवित्र सण साजरा केला जातो. यावर्षी 1 नोव्हेंबरला दिवाळीचा पवित्र सण साजरा केला जात आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार 1 नोव्हेंबर, म्हणजेच दिवाळीला अनेक दुर्मिळ योग घडत आहेत. यंदा दिवाळीत नवपंचम राजयोग, शुक्र गुरूचा संसप्तक राजयोग आणि शनी कुंभ राशीत असल्याने शश राजयोग निर्माण होत आहे. काही राशीच्या लोकांना या शुभ योगांचा फायदा होईल. या राशीच्या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा राहील, या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
ग्रहांच्या शुभ संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांचा खिसा भरलेला असेल, पण या काळात तुमचा खर्चही खूप जास्त असेल. ही वेळ तुमच्यासाठी राजयोग घेऊन आली आहे, परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे कमाईपेक्षा जास्त खर्च करणं तुम्हाला महागात पडू शकतं. या काळात तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहील आणि तुम्ही व्यवसायात खूप नाव कमवाल. गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होईल. तुमच्याकडे भरपूर पैसा असेल आणि करिअरमध्ये तुमची अनपेक्षित प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांना या काळात आर्थिक फायदा होईल. मेहनती व्यक्ती म्हणून तुमची प्रतिमा तयार होईल. कठीण परिस्थितीतही तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडून शक्य ती सर्व मदत मिळत राहील. जुगार किंवा सट्टेबाजीपासून दूर रहा. लक्ष्मी नारायण राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे तुमची जीवनात प्रगती होईल आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये उत्कृष्ट संधी मिळतील. तुमच्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असेल आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले राहतील.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीचे लोक ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे आनंदी जीवन जगतील. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही फायदे मिळतील. तुमच्या बोलण्याचा लोकांवर चांगला प्रभाव पडेल. तुमचं उत्पन्नही वाढेल. तुम्ही तुमच्या क्षमतेने आणि कलेने सर्वांना तुमच्याकडे आकर्षित कराल. या काळात तुमचा ऑरा विनोदी असेल. बाप्पाच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. शत्रू देखील तुमचं काही बिघडवू शकणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: