Astrology Panchang 17 October 2024 : आज 17 ऑक्टोबरचा दिवस म्हणजेच गुरुवारचा दिवस हा अनेक अर्थांनी खास असणार आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे तसेच आजच्या दिवशी हर्षण योग (Yog), सर्वार्थ सिद्धी योग आणि रेवती नक्षत्रासारखे शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. आजच्या दिवसात तुमचा मान-सन्मान वाढले, समाजात तुम्हाला चांगली वागणूक मिळेल.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या लकी राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. गुरु ग्रहाचा शुभ परिणाम मिथुन राशीच्या लोकांवर होणार आहे. आजच्या दिवशी धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल.तसेच, पूजा पाठ करण्यात तुम्ही मग्न असाल. नवीन कल्पना तुम्हाला सुचतील. तसेच, इतरांची मदत करण्यास तुम्ही समर्थ असाल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज सकाळ-सकाळ तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून जे तुमचे काम रखडले होते ते आज पूर्ण होईल. धनप्राप्तीचे देखील चांगले संकेत आहेत. आज जर तुम्हाला भविष्याबद्दल काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी अनेक लोकांशी तुमच्या गाठीभेटी होतील. तसेच, सामाजिक कार्यात तुमचं जास्त योगदान असेल. तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही अगदी सकारात्मक असाल. व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं असल्यास आज नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या कामात तुम्हाला चांगला नफा मिळेल. मात्र, आज कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमचं मन नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त रमेल आणि तुम्ही त्यानुसार प्लॅन कराल. तसेच, विद्यार्थ्यांनी अभ्यासात जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :