Diwali 2023 Vastu Tips: दिवाळीत (Diwali 2023) तुमचं घर सुंदर बनवण्यासाठी वास्तू टिप्स जाणून घेणं महत्त्वाचं आहे. वास्तूनुसार तुमच्या घरात वस्तूंचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे, यासाठी वास्तू जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. घरातील सर्व वस्तू वास्तूशास्त्रानुसार असतील तर घरात समृद्धी नांदते. तर वास्तूनुसार घरामध्ये पलंग (Bed) कोणत्या दिशेला असावा? घरात जेवणाचा टेबल (Dining Table) असेल तर तो कोणत्या दिशेला असावा? घरातील मंदिर कोणत्या दिशेला असावं? हे आज जाणून घेऊया.
डायनिंग टेबल कोणत्या दिशेला ठेवावा? (In Which Direction You Should Keep Dinning Table)
घरात डायनिंग टेबल असणं खूप शुभ मानलं जातं. अन्न नेहमी जेवणाच्या खोलीतच खावं; अंथरुणावर अन्न खाल्ल्याने दोष निर्माण होतात, म्हणून तसं करणं टाळावं. जेवणाची खोली दक्षिण, पश्चिम किंवा पूर्व दिशेला स्वयंपाकघराशी जोडलेली असावी. घरात डायनिंग टेबल ठेवण्यासाठी आदर्श दिशा पश्चिम आहे, कारण ते अन्न खाण्यासाठी सर्वात शुभ स्थान मानलं जातं.
पलंग कोणत्या दिशेला ठेवावा? (In Which Direction You should Keep Bed)
जर तुम्ही घरी नवीन बेड आणत असाल किंवा तुमच्या घरातील फर्निचर बदलण्याचा विचार करत असाल तर या वास्तु टिप्स तुम्हाला मदत करू शकतात. बेडरूममध्ये पलंग नेहमी दक्षिण-पश्चिम (South-West) दिशेला ठेवावा. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचं डोकं नेहमी दक्षिण (South) दिशेला असावं, अशा जागी पलंग ठेवा. चुकूनही कधी दक्षिणेकडे पाय करुन झोपू नका, हे वास्तूनुसार अशुभ मानलं जातं.
घरातील देवाचं मंदिर कोणत्या दिशेला असावं? (Mandir Should Be Kept In which Direction)
जर तुम्ही घरात मंदिराची किंवा देव्हाऱ्याची स्थापना करत असाल तर घराचं मंदिर नेहमी उत्तर-पूर्व (North East) किंवा ईशान्य दिशेला असावं याची विशेष काळजी घ्या. ईशान्य दिशेला देवांचा वास असतो, त्यामुळे ही दिशा मंदिरासाठी शुभ मानली जाते. दिवाळीपूर्वी घरातील मंदिराची वास्तू दुरुस्त करायची असेल तर ती ईशान्य दिशेला ठेवा. घरातील मंदिर ईशान्य दिशेला बनवा, यामुळे घरात सुख-शांति नांदेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
November 2023: नोव्हेंबर महिना 'या' राशींसाठी भाग्यवान; अपूर्ण कामं होतील पूर्ण, शत्रूंचा होईल पराभव