Dhantrayodashi 2022 : धनत्रयोदशी दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला साजरी केली जाते.  दिवाळीच्या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासूनच होते. धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि धन्वंतरी देवतेची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि घर धन व अन्नाने भरलेले राहते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. विशेषतः सोन्या-चांदीची नाणी किंवा दागिने खरेदी करणे शूभ मानले जाते.

Continues below advertisement

असे मानले जाते की, धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. धनत्रयोदशीचा सण एका दिवसांवर येऊन ठेपला आहे. 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीची पूजा केली जाईल तर दोन्ही दिवशी खरेदी करता येईल. धनत्रयोदशीच्या दिवशी शनिचेही मकर राशीत संक्रमण होणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी पहाटे 4:19 वाजता शनि मकर राशीत भ्रमण करेल. मकर राशीत शनीचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल. चला तर मग जाणून घेऊया या वर्षी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शनीच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होईल. 

मिथुन : धनत्रयोदशीच्या निमित्ताने मिथुन राशीच्या लोकांचा काळ आर्थिक दृष्टीकोनातून चांगला राहील. या काळात तुम्हाला वारसा किंवा वडिलोपार्जित मालमत्तेच्या रूपात किंवा भूतकाळात केलेल्या तुमच्या गुंतवणुकीतून अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या दरम्यान, कोणाशीही वाद घालू नका, तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची देखील विशेष काळजी घ्या. 

Continues below advertisement

तूळ : धनत्रयोदशीला शनीच्या राशीत बदलामुळे तुम्हाला भौतिक लाभ मिळतील. जर तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती किंवा विवादित मालमत्तेशी संबंधित समस्या येत असतील तर या काळात तुम्हाला चांगला होईल. जर तुम्ही व्यवसायासाठी जमीन किंवा मालमत्ता किंवा कार घेण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी खूप चांगली आहे. 

धनु : या काळात तुमच्या पैशांच्या खर्चावर नियंत्रण राहील. यावेळी तुम्ही चांगली कमाई कराल आणि पैशाची बचत करण्यातही यशस्वी व्हाल. या काळात तुम्हाला कौटुंबिक जीवनात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. यावेळी तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास, तुम्हाला मानसिक तणावालाही सामोरे जावे लागेल.   

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या