Devuthani Ekadashi 2025 : हिंदू सनातन धर्मानुसार, देवउठनी एकादशीला (Dev Uthani Ekadashi) फार महत्त्व आहे. त्यानुसार आज म्हणजेच 1 नोव्हेंबर 2025 रोजी देवउठनी एकादशीचा व्रत ठेवला जाणार आहे. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी देखील म्हणतात. ही एकादशी फार महत्त्वाची असते कारण या काळात भगवान विष्णू चार महिन्यांनंतर जागृत होतात. त्यामुळे या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते. 

Continues below advertisement

मान्यतेनुसार, देवउठनी एकादशीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी काही विशेष उपाय करणं शुभकारक मानलं जातं. तर, देवउठनी एकादशीला राशीनुसार, कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

देवउठनी एकादशीला मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी तुळशीला फूल आणि चंदन चढवा. तसेच, भगवान विष्णूला नैवेद्य आणि खीर अर्पण करा. 

Continues below advertisement

वृषभ रास (Scorpio Horoscope)

या दिवशी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुळशीला नैवेद्यात दूध-तांदळाची खीर अर्पण करा. तसेच, भगवान शालिग्राम यांना दुधापासून स्नान करुन विधीवत पूजा करावी. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

देवउठनी एकादशीच्या दिवशी हिरवी मूग डाळ दान करा. तसेच, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. 

कर्क रास (Cancer Horoscope)

आजच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूचं अभिषेक दुधाने करा, तसेच, हळदीच्या गाठीसुद्दा नैवेद्यात द्या. 

सिंह रास (Leo Horoscope)

देवउठनी एकादशीच्या दिवशी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णूला गूळ आणि उसाचा नैवेद्य अर्पण करा. तसेच, सूर्यदेवाला अर्घ्य द्या. 

कन्या रास (Virgo Horoscope)

आजच्या दिवशी गरिबांना तसेच, गरजू व्यक्तीला दान करण्याला फार महत्त्व आहे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. 

तूळ रास (Libra Horoscope)

आजच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्रीहरीची पूजा करा. तसेच, नैवेद्यात पांढरी मिठाई अर्पण करा. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

आजच्या दिवशी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णूच्या मंदिरात पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करा. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

देवउठनी एकादशीला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णूच्या मंदिरात पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच, फळं दान करा. तसेच, विष्णू चालीसाचं पठण करा. 

मकर रास (Capricorn Horoscope)

भगवान विष्णूला पंचामृतने स्नान करा. तसेच, पूजेत निळ्या रंगाचं आसन दान करा. ‘ॐ महात्मने नमः और ऊँ लक्ष्म्यै नमः’ या मंत्राचा जप करा. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

देवउठी एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. तसेच, तिळाचं दान करा. 

मीन रास (Pisces Horoscope)

या दिवशी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णूला केळी आणि हळद चढवा. तसेच, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Chalis Yog 2025 : नोव्हेंबर महिन्यात बुध-शुक्र ग्रहाचा शक्तिशाली 'चालीस योग'; आज रात्रीपासूनच 'या' 4 राशींचं भाग्य उजळणार, लवकरच लागणार लॉटरी