Dev Diwali Remedies: देव दिवाळीचा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी देव हे दिवाळी साजरी करण्यासाठी पृथ्वीवर येतात. यंदा कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळी (Dev Diwali) वेगवेगळ्या दिवशी साजरी केली जात आहे. वास्तविक, पौर्णिमा रविवारी (26 नोव्हेंबर 2023) दुपारपासून सुरू होईल आणि सोमवारी (27 नोव्हेंबर 2023) दुपारपर्यंत चालू राहील. परंतु, सोमवारी प्रदोष व्यापिनी मुहूर्त नसल्यामुळे 26 नोव्हेंबरला रात्री देव दिवाळी साजरी केली जाईल. देव दिवाळीच्या रात्री काही विशेष उपाय केले तर व्यक्ती श्रीमंत होण्यास वेळ लागत नाही. या उपायांबद्दल जाणून घेऊया.


देव दिवाळीचे उपाय 


देव दिवाळीच्या दिवशी दिवे दान करण्याला खूप महत्त्व आहे. यासोबतच गंगा स्नानही केले जाते. असे केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. देव दिवाळीचे उपाय ज्योतिष शास्त्रात सांगितले आहेत, याने जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात. 


नकारात्मकता दूर करण्याचे उपाय


देव दिवाळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली पिठाचा दिवा लावा. यासाठी मीठ न घालता पीठ मळून घ्या. दिवा लावल्यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. घरात सकारात्मकता येईल आणि सुख-शांति येईल.


संपत्ती मिळविण्याचे उपाय


आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी दिवाळीच्या दिवशी काही नाणी घराच्या मंदिरात ठेवा आणि नंतर रोज रोळी लावून त्या नाण्यांची पूजा करा. यासोबतच आशीर्वादासाठी देवी लक्ष्मीची प्रार्थना करा. आर्थिक स्थिती काही वेळात सुधारण्यास सुरुवात होईल, चांगले दिवस येतील.


लग्न लवकर होण्यासाठी उपाय


देव दिवाळीच्या दिवशी 3 किंवा 7 हळकुंड घ्या, नंतर लाल कपड्यात गुंडाळा आणि तुळशीमातेला किंवा भगवान विष्णूला अर्पण करा. असे केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता असते. 


घरातून वास्तू दोष दूर करण्याचे उपाय


दिवाळीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावा. यानंतर संपूर्ण घरामध्ये शंख वाजवा. (शौचालयात किंवा अस्वच्छ ठिकाणी हे करू नका). असे केल्याने वास्तुदोष आणि राहू इत्यादी ग्रह दूर होतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Numerology Horoscope 27 November To 3 December: नवीन आठवड्यात 'या' जन्मतारखेच्या लोकांच्या जीवनात आनंद; सर्व कामं होणार पूर्ण