Continues below advertisement

Delhi Blast Case: ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या ग्रहांच्या हालचालींमुळे विविध शुभ किंवा अशुभ योग बनत आहेत. अशात काही अशा अनपेक्षित दुर्घटना घडत असल्याने अनेक ज्योतिषींनी याबाबत आधीच भाकित केल्याचा दावा केला जात आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर, ज्योतिषी प्रशांत किनी यांनी ऑगस्टमध्ये "पहलगाम-2" बद्दल केलेली भविष्यवाणी पुन्हा एकदा समोर आली आहे. या स्फोटानंतर पुन्हा एकदा 'ऑपरेशन सिंदूर-2 होणार, असा दावा ज्योतिषींकडून करण्यात येतोय. त्यांची ही भविष्यवाणी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.

पहलगाम हल्ला पुन्हा? ऑगस्टमध्ये केलेली 'ती' भविष्यवाणी सत्य होणार?

ज्योतिषी प्रशांत किनी यांनी ऑगस्टमध्ये "पहलगाम-2" बद्दल केलेली भविष्यवाणी पुन्हा एकदा व्हायरल होतेय. किनी यांनी या स्फोटाला दहशतवादी हल्ला म्हटले आहे, भारतीय ज्योतिषी प्रशांत किनी यांनी "पहलगाम-2" बद्दल केलेल्या त्यांच्या आधीच्या भाकितामुळे चांगलेच चर्चेत आहेत. ऑगस्टमध्ये त्यांनी दावा केला होता की "पहलगाम-2 नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 मध्ये होईल." जुन्या दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या घातक स्फोटानंतर किनी यांची जुनी पोस्ट पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली.

Continues below advertisement

हा दहशतवादी हल्लाच - ज्योतिषींचा दावा

दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील कार स्फोट झाल्यानंतर ज्योतिषी किनी यांनी त्यांच्या मागील भाकिताचा संदर्भ दिला, आणि म्हणाले की, तो स्फोट "लाल किल्ला या ठिकाणी झालेला कार स्फोट हा दहशतवादी हल्ला आहे", तसेच ते म्हणाले की "स्फोटाच्या ठिकाणापासून 300 मीटर अंतरावर मानवी शरीराचे अवयव विखुरलेले होते...त्यामुळे कट रचून केलेला हल्ला असल्याचं ते म्हणाले.

सोमवारी दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एकजवळ लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. दिल्ली पोलिसांनी (UAPA), स्फोटक कायदा आणि भारतीय न्याय संहिता (BNS) यासह विविध तरतुदींनुसार या स्फोटाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये हा स्फोट झाला, अधिकाऱ्यांच्या मते, ही कार जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी फरीदाबाद येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला बनावट कागदपत्रांवर विकण्यात आली होती.

हेही वाचा

Mangal Shani Yuti: पुढच्या 48 तासांत 5 राशींचं नशीब पालटणार! मंगळ-शनिची जबरदस्त युती, उत्पन्न, पैसा दुप्पट करणार, श्रीमंतीचे योग

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)