Datta Jayanti 2025 : हिंदू धर्मग्रंथात दत्त जयंतीला (Datta Jayanti) विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. त्यानुसार, उद्या मार्गशीर्ष महिन्याच्या तिथीला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त गुरुंचा जन्म झाला. भगवान दत्तात्रेय यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या त्रिमूर्तीचा एक भाग मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला भगवान दत्तगुरुंचा जन्म झाला. उद्या दत्त जयंती पौर्णिमा सकाळी 08 वाजून 38 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 05 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 4 वाजून 44 मिनिटांनी ही पौर्णिमा समाप्त होणार आहे. त्यामुळे आजच्या शुभ दिवशी काय करावं आणि काय करु नये हे जाणून घेऊयात.
दत्त जयंतीला आवश्यक कराव्यात 'या' गोष्टी
- दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात किंवा घरी त्रिमूर्तीची मनोभावे पूजा करावी.
- या दिवशी भगवान दत्तांच्या मूर्तीची स्थापना करुन गंगाजलाने स्नान करावं.
- तसेच, देवाला फळं, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा.
- दत्त जयंतीच्या दिवशी भगवदगीतेचे पठण करणे शुभ मानले जाते. यामुळे संकटं दूर होतात असं म्हणतात.
- तसेच, या दिवशी गरिबांना, गरजू व्यक्तींना दान करणं शुभ मानलं जातं.
दत्त जयंतीला 'या' गोष्टी चुकूनही करु नका
- दत्त जयंतीच्या दिवशी मांसाहार खाणं टाळावं.
- तसेच, आजच्या दिवशी मद्यपान करणं अशुभ मानलं जातं.
- आजच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी अपशब्द वापरु नये.
- तसेच, कोणत्याही व्यक्तीशी बोलताना विनाकारण वाद करु नका.
- आजच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी खोटंही बोलू नये.
- तसेच, घराबाहेर पडताना रिकाम्या हाती घराबाहेर पडू नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :