Daridra Yog 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळानुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्यावेळी ग्रह दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्यावेळी शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात, ज्याचा थेट परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर पडतो. यावेळी बुध ग्रह 9 एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. बुध (Mercury) ग्रहाच्या या स्थितीमुळे दरिद्र योग (Daridra Yog) निर्माण होणार आहे. 


वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाच्या राशी बदलामुळे दरिद्र हा अशुभ योग तयार होणार आहे. या अशुभ योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. परंतु अशा 3 राशी आहेत, ज्यांचं आयुष्य या काळात विस्कळीत होईल. या राशींचं आर्थिक नुकसानही होऊ शकतं. नेमक्या कोणत्या राशींना (Zodiac Signs) या काळात विशेष काळजी घ्यावी लागेल? जाणून घेऊया


मिथुन रास (Gemini)


हा अशुभ योग मिथुन राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकतो, कारण तुमच्या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या पायांशी संबंधित आजार देखील उद्भवू शकतात, तुमचं आरोग्य खराब राहील, त्याचबरोबर वडिलांची प्रकृती बिघडू शकते. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना या काळाच अपेक्षेपेक्षा कमी नफा मिळेल.


कन्या रास (Virgo)


दरिद्र योग तयार झाल्यामुळे कन्या राशीच्या लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होणार आहे. या अशुभ योगामुळे तुमचे वाईट दिवस सुरू होऊ शकतात. यावेळी तुम्हाला काही छुप्या आजाराने ग्रासलं असेल. नोकरदार लोकांनी या काळात कामाच्या ठिकाणी निष्काळजी राहू नये, या काळात तुम्हाला सहकाऱ्यांकडून योग्य साथ मिळणार नाही. तुमच्या जोडीदाराशी तुमचे मतभेद होऊ शकतात. या काळात तुम्हाला दुखापत होऊ शकते. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ उचित नाही.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांसाठी दरिद्र योग अशुभ सिद्ध होणार आहेत. या काळात कोणालाही कर्ज देऊ नका, अन्यथा पैसे बुडू शकतात. त्याच वेळी, आपण या काळात कोणत्याही मालमत्तेत पैसे गुंतवू नये. खर्चात वाढ झाल्यामुळे तुम्हाला संकटाचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळावी. या काळात तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडेल. तुम्हालाही पाय आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यावेळी तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :


Budh Vakri 2024 : बुध ग्रह मेष राशीत होणार वक्री; 'या' 3 राशींसोबत घडणार भलत्याच घडामोडी, हातातून पैसाही निसटणार