Vastu Tips : अगदी साधा असा दिसणारा झाडू कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. झाडू घरातील कचरा आणि धूळ यासोबतच गरिबी देखील साफ करतो. झाडूला लक्ष्मीच्या रुपात पाहिलं जातं. लक्ष्मीच घरातील दारिद्र्य, दुःख, कलह आणि संकट दूर करू शकते. दुकान असो, घर असो किंवा ऑफिस, झाडूची योग्य देखभाल झाली तरच माणूल नशीबवान बनू शकतो.
झाडूमुळे गरिबी दूर होते आणि संपत्ती वाढते
कचरा साफ करण्यासाठी झाडूचा वापर केला जातो. झाडू हे घरातील संपत्तीचं प्रतीक आहे, म्हणून ते सांभाळून ठेवावे. त्यामुळे कुणाच्या घरातील झाडू दुसऱ्या कुणाला वापरण्यासाठी देखील दिला जात नाही. मान्यतेनुसार, एखाद्या घरातील झाडू नकळत दुसऱ्या घरात पोहोचला, तर घरावरील आशीर्वाद दूर होऊ लागतात.
झाडूचा आदर केल्यास व्यवसायात होत नाही नुकसान
व्यावसायिकांनी झाडूचा विशेष आदर केला पाहिजे. घरातील किंवा दुकानातील झाडूचा अनादर केल्याने किंवा झाडूला लाथ मारल्याने व्यापारी वर्गाचा पैसा क्षणात नाहीसा होतो. त्यामुळे घरामध्ये तसेच दुकानात झाडू योग्य ठिकाणी ठेवावा, झाडू बाहेरच्या व्यक्तीच्या नजरेस पडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
संध्याकाळनंतर झाडू मारणं समजलं जातं अशुभ
पुरातन मान्यतेनुसार, झाडू ही घरातील लक्ष्मी असते, जी घरातील गरिबी दूर करते. पूर्वीचे लोक म्हणायचे की, अंधार पडल्यावर घर झाडल्याने दारिद्र्य येते, झाडूवर पाऊल पडल्यास लक्ष्मीचा कोप होतो, तिला राग येतो आणि ती घर सोडते.
नवीन घरात जुना झाडू घेऊन जाणे आणि एखादी व्यक्ती घरातून बाहेर पडल्यावर लगेच झाडून काढणे हे अशुभ मानले जाते. नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी नवीन झाडू घरात आणणे शुभ असते. घरावरील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि घराच्या भरभराटीसाठी झाडूशी संबंधित काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.
झाडूशी संबंधित या चुका टाळा
- झाडू कोणत्याही जड वस्तूखाली ठेवू नये. घरातील कोणत्याही जड वस्तूखाली झाडू चुकून दाबला गेला तर त्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात.
- घरात झाडू वापरात नसताना तो नजरेआड ठेवावा.
- झाडू कधीही उभा ठेवू नये.
- जाणून बुजून झाडूवर पाऊल टाकू नये हे लक्षात ठेवा.
- झाडू नेहमी स्वच्छ ठेवा.
- फार जुनी झाडू घरात ठेवू नका.
- झाडू कधीही जाळू नये.
- जुना झाडू बदलायचा असेल तर शनिवारी जुना झाडू बदलणे शुभ मानले जाते.
- शनिवारी घरात विशेष स्वच्छता करावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: