Chandra Grahan And Surya Grahan Date 2025 : हिंदू धर्मानुसार, सूर्य ग्रहण (Surya Grahan) आणि चंद्र ग्रहणाला (Chandra Grahan) अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की, जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा नकारात्मकता वाढते. त्यामुळे या दरम्यान पूजा किंवा कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. त्यानुसार, नवीन वर्ष 2025 मध्येही 4 ग्रहण लागणार आहेत. यामध्ये 2 सूर्य ग्रहण तर, 2 चंद्र ग्रहण असतील. तसेच, वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण लवकरच लागणार आहे.
2025 वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण (Surya Grahan 2025)
ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण 29 मार्च रोजी शनिवारी लागणार आहे. हे सूर्य ग्रहण चैत्र शुक्ल पक्षाच्या अमावस्येला लागणार आहे. मात्र, हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतीयांसाठी सुतक काळ लागणार नाही. हे ग्रहण उत्तर अमेरिका, ग्रीनलॅंड, उत्तर अटलांटिका महासागर तसेच, युरोप या देशांत दिसणार आहे.
2025 वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण (Chandra Grahan 2025)
ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण 14 मार्च रोजी शुक्रवारी फाल्गुन पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी लागणार आहे. या दिवशीच होलिका दहन होणार आहे. हे ग्रहण सकाळी 10 वाजून 39 मिनिटांनी सुरु होणार आहे. हे ग्रहण दुपारी 2 वाजून 18 मिनिटांनी संपेल. मात्र, भारतात हे चंद्र ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे भारताला सूतक काळ लागणार नाही.
सूर्यग्रहणाच्या वेळी 'ही' कामे अजिबात करु नका
धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा सूर्यग्रहण लागते तेव्हा ते कधीच उघड्या डोळ्यांनी बघू नये. कारण यामुळे तुमच्या डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. तसेच, या दिवशी घराबाहेर पडू नका. तसेच, भोजन आणि पाण्याचं सेवन करु नका. या दरम्यान डोक्यावरचे केस आणि नखं कापणं वर्जित मानलं जातं. हे नियम वृद्ध, आजारी आणि लहान मुलं सोडून सर्वांवर लागू आहेत. तसेच, या कालावधीत श्राद्ध देखील करु नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :