Chandra Grahan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2026 या वर्षाचं शेवटचं चंद्र ग्रहण (Chandra Grahan) 28 ऑगस्ट रोजी लागणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार, राहू आणि केतूमुळे चंद्र ग्रह अडचणीत येणार आहे. यामुळे अनेक राशींना नकारात्मक अनुभव येतील. अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. 

Continues below advertisement

ज्योतिष शास्त्रानुसार, यावेळेस चंद्रग्रहण ज्योतिष शास्त्रानुसार, फार संवेदनशील असणार आहे. ग्रहण काळात चंद्र आपला शत्रू ग्रह शनिच्या कुंभ राशीत आणि शत्रू ग्रह असलेल्या शतभिषा नक्षत्रात विराजमान असणार आहे. शनि आणि राहूच्या प्रभावाने चंद्र ग्रह पूर्णपणे या अडचणीत येणार आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर होणार आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

या राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे याचा थेट तुमच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसणार आहे. तसेच, तुम्हाला आर्थिक नुकसानीचा देखील सामना करावा लागू शकतो. या काळात कोणाशीही पैशांची गुंतवणूक करु नका. नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहा. 

Continues below advertisement

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ फार कठीण असणार आहे. या काळात अनियंत्रित खर्चापासून दूर राहा. तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. मानसिक तणाव वाढू शकतो. अशा वेळी तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. घरी विनाकारण वादविवाद टाळा. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी देखील हा काळ फार सतर्कतेचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी अनेक चढ-उतार तुम्हाला जाणवतील. पैशांशी संबंधित कोणताही व्यवहार घाईगडबडीत करु नका. कामाच्या ठिकाणी जपून व्यवहार करा. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांनी या काळात कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. पैशांच्या बाबतीत कोणतीही गुंतवणूक करु नका. तसेच, तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                                           

Horoscope Today 19 August 2026 : आज बुधवारच्या दिवशी 8 राशींवर असणार टांगती तलवार, फक्त 4 राशींना मिळणार पुण्याचं फळ; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य