Chandra Grahan 2025 : वैदिक शास्त्रानुसार, 7 सप्टेंबर 2025 रोजी या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण (Chandra Grahan 2025) लागणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात संपूर्णपणे दिसणार आहे. मात्र, या काळात गर्भवती महिलांनी काय करावे? आणि काय टाळावे? तसेच, गर्भवती महिलांसाठी चंद्रग्रहणाच्या वेळी काळजीचे नियम कोणते घ्यावेत याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

1. टोकदार वस्तूंचा वापर टाळा 

ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी सुई, कात्री, चाकू यांसारख्या टोकदार वस्चूंचा वापर करणे टाळावे. अशा वस्तूंचा वापर किंवा स्पर्श अशुभ मानला जातो. त्यामुळे आरोग्याचा त्रास होण्याची शक्यता वाढते. 

2. चंद्रग्रहण थेट पाहू नका

गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण थेट पाहू नये. ग्रहणाच्या काळात चंद्राच्या किरणांना अशुद्धमानले जाते. जे गर्भात असलेल्या बाळावर वाईट परिणाम करु शकते. 

3. बाहेर न जाता राहा

ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी शक्यतो घराबाहेर न पडणे योग्य ठरते. विशेषत: रात्रीच्या वेळी नाईट लॅंडिंग आणि अंधाऱ्या ठिकाणी जाणे टाळा. 

4. ग्रहण काळात अन्न बनवू नका आणि खाणे टाळा

चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न बनवणे आणि ग्रहण करणे टाळावे. असे मानले जाते की, ग्रहणामुळे अन्न दूषित होते, ज्यामुळे गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

5. आधीपासून तयार केलेले अन्न सुरक्षित ठेवा 

घरात आधीपासून तयार अन्न असेल तर त्यात तुळशीची पाने घालून ठेवावी. तुळस अन्न शुद्ध ठेवण्यास मदत करते. 

चंद्रग्रहणात गर्भवती महिलांनी काय करावे?

  • ग्रहण काळात शांतीने घरात राहा आणि धार्मिक मंत्रांचे जप करा. 
  • हनुमान चालीसा, गायत्री मंत्र यांचा उच्चार करणे शुभ मानले जाते.
  • ग्रहण संपल्यानंतर पवित्र जलाने स्नान करा, शक्य असल्यास गंगाजल वापरा. 
  • स्वच्छ, नवीन वस्त्र परिधान करा. 
  • ग्रहण संपल्यानंतर दानधर्म करा, ज्यामुळे शुभ फळ प्राप्त होतात. 

हेही वाचा :                                                                                    

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Chandra Grahan 2025 : साडेसाती आणि ढैय्या राशींवर चंद्रग्रहणाचा परिणाम होणार? असल्यास, कोणती काळजी घ्याल? वाचा ज्योतिषशास्त्र