Chandra Grahan 2025 : वैदिक पंचांगानुसार, 2025 चं यंदाचं सर्वात मोठं चंद्रग्रहण (Chandra Grahan 2025) 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. कुंभ राशीत हे चंद्रग्रहण लागणार आहे. तसेच, या दिवशी समसप्तक योग (Yog) देखील जुळून येणार आहे. हा योग मंगळ आणि शनि ग्रह मिळून जुळून येणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, या काळात तीन राशींच्या उत्पन्नात चांगली वाढ देखील होईल, नोकरीत प्रगतीचे अनेक संकेत आहेत. या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ निर्माण होऊ शकते. तसेच, या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. तसेच, सामाजिक क्षेत्रात तुमची प्रगती झालेली दिसेल. तसेच, या काळात तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तसेच, तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, परदेशात जाण्याची संधी मिळेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

समसप्तक योग जुळून आल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी या राशींच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होतील. तसेच, कामकाजात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही नियोजित केलेली सर्व कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करु शकता. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, नातेवाईकांबरोबर चांगले संबंध निर्माण होतील. तसेच, तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करु शकता. तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. आर्थिक स्थिती चांगली असेल. 

हेही वाचा :                                                              

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Chandra Grahan 2025 : साडेसाती आणि ढैय्या राशींवर चंद्रग्रहणाचा परिणाम होणार? असल्यास, कोणती काळजी घ्याल? वाचा ज्योतिषशास्त्र