Chandra Grahan 2024: सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना असू शकतात, पण ज्योतिषशास्त्रात त्यांचे विशेष महत्त्व आहे. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेला म्हणजे 25 मार्च रोजी आहे. 100 वर्षाने धुलीवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहण 25 मार्चला सकाळी 10 वाजून 24 मिनिटानी सकाळी सुरू होईल आणि दुपारी 3 वाजून एक मिनिटानी समाप्त होणार आहे. ग्रहणाचा कालावधी हा एकूण 4 तास 36 मिनिटाचा असणर आहे.
वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे कन्या राशीत असणार आहे. चंद्रग्रहण हे सामान्य चंद्रग्रहण नसून ते उपछाया चंद्रग्रहण आहे. योगायोगाने वर्षातील दुसरे सूर्यग्रहण देखील कन्या राशीत असणार आहे. धुलीवंदनच्या दिवशी हे चंद्रग्रहण असणार आहे. 2 ऑक्टोबरला असणरे सूर्यग्रहण हे देखील कन्या राशीत असणार आहे. यंदा होलिका दहन 24 मार्चला होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मार्चला धुलीवंदन असणार आहे होलाष्टक 8 दिवसांपूर्वी म्हणजेच 17 मार्चपासून सुरू झाला आहे. चंद्रग्रहणाची वेळ आणि चंद्रग्रहणाचा राशीवर होणारा प्रभाव जाणून घेऊया.
कोणत्या राशीसाठी चंद्रग्रहण फलदायी ( Grahan Effect on Rashi)
धुलीवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहणाच्या काळात चंद्र कन्या राशीत असणार आहे. चंद्रग्रहणच्या दिवशी चंद्राबरोबर केतू देखील असणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव कन्या राशीवर असणार आहे. कन्या राशीसठी हे चंद्रग्रहण शुभ असणार आहे. कन्या राशीच्या सर्व समस्या संपणार आहेत. त्यांचा शुभ काळ सुरू होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी आणि व्यवसायासाठी हा काळ अतिशय उत्तम आणि शुभ राहील. कन्या राशीचे लोक ज्यांना अनेक दिवसांपासून त्रास होत होता, त्यांचा त्रास आता संपुष्टात येईल. प्रेम जीवनात आनंद मिळेल आणि इतरांच्या सहवासाचा आनंद घ्याल.
चंद्रग्रहण कधी आहे? ( When does the Lunar Eclipse Occur?)
जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. त्यामुळे सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्राचा सावलीचा भाग गडद होतो. जेव्हा आपण पृथ्वीवरून चंद्राकडे पाहतो तेव्हा तो भाग आपल्याला काळा दिसतो. या स्थितीला आपण चंद्रग्रहण म्हणतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
यंदा 100 वर्षांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग!'या' पाच लोकांनी चुकूनही पाहू नका होलिका दहन, अन्यथा होळीचा होईल बेरंग