Chandra Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रात चंद्राच्या संक्रमणाला (Chandra Gochar) फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. खरंतर, चंद्राच्या या संक्रमणाचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर थेट होतो. द्रिक पंचांगानुसार, 12 एप्रिल 2026 रोजी रात्री 1 वाजून 19 मिनिटांनी चंद्राने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. तो अडीच दिवस याच राशीत स्थित असणार आहे.
कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. याला शनिचा शत्रू ग्रहसुद्धा मानतात. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या आठव्या चरणात हे संक्रमण झालं आहे. या राशीच्या लोकांना अघटित घटनांचा सामना करावा लागेल. या काळात तुमचा मानसिक तणाव वाढेल. तसेच, तुमच्या कार्यात अनेक अडथळे येतील. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवर राग येऊ शकतो.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी चंद्राचं हे संक्रमण सहाव्या भावात होणार आहे. या काळात तुम्हाला ऑफिस किंवा घरातील वातावरणाचा मानसिक त्रास होईल. तसेच, या काळात तुम्हाला धार्मिक यात्रेचा प्रवास करताना काळजी घेण्याची गरज आहे. अनेक मोठे निर्णय नीट विचारपूर्वक घ्या. तसेच, रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या बाराव्या चरणात चंद्राचं संक्रमण होणार आहे. या काळात तुमच्या खर्चात अनावश्यक वाढ होईल. तसेच, या दरम्यान तुम्हाला पैशांशी संबंधित अनेक अडथळे येऊ शकतात. तुम्हाला मानसिक शांतता मिळू शकणार नाही. तसेच, तुम्ही घेतलेले अनेक निर्णय फसू शकतात. नात्यात गैरसमजही निर्माण होऊ शकतात.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
