Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. ते भारतीय राजकारण आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात. प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याची त्यांची हातोटी होती. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी त्यांनी चाणक्य नीती शास्त्राचा शोध लावला. आजवर आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले. 

Continues below advertisement

चाणक्य नीतीमध्ये जीवनाच्या विविध पैलूंवरील धोरणे आणि शिकवण दिलेली आहे. चाणक्य यांचा असा विश्वास होता की, जी व्यक्ती आयुष्यात यश संपादन करते त्यांना अनेक शत्रू असतात. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला आपल्या शत्रूचा कसा सामना करायचा हे माहित असणं गरजेचं आहे. 

शत्रूंवर विजय मिळवण्याची रणनीती 

1. तुमचा शत्रू ओळखा 

जर तुम्हाला तुमच्या शत्रूंचा सामना करायचा असेल तर त्यासाठी सर्वात आधी तुमचा शत्रू नेमका कोण हे जाणून घ्या. तसेच, आपल्या मित्रांना ओळखा आणि त्यांचा आदर करा, आपल्या शत्रूंना ओळखा आणि त्यांच्यापासून सावध रहा.

Continues below advertisement

2. शत्रूसमोर तुमची कमजोरी दाखवू नका 

शत्रूसमोर तुमची कमजोरी कधीही दाखवू नका. त्यापेक्षा त्याच्यासमोर तुमची ताकद आणि सामर्थ्य दाखवा जेणेकरून शत्रू तुम्हाला घाबरत राहील. 

3. रणनीती बनवा 

आपल्या शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हेरगिरी पद्धत वापरा. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी प्रथम रणनीती बनवणे आवश्यक आहे. तुमची रणनीती गुप्त ठेवा आणि वेळ आल्यावर त्याचा वापर करा.

4. संयम ठेवा 

शत्रूवर विजय मिळवण्यासाठी संयम आवश्यक आहे. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या मित्रांची मदत घ्या. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी खरे मित्र तुम्हाला मदत करू शकतात.

5. शत्रूची कमकुवतता शोधा 

तुमच्या शत्रूची कमकुवतता शोधा आणि ती तुमच्या रणनीतीमध्ये वापरा. जर शत्रूने पराभव स्वीकारला आणि क्षमा मागितली तर त्याला क्षमा केली पाहिजे.

6. शत्रूला कमजोर समजू नका 

तुमच्या यशात इतके मग्न होऊ नका की तुम्ही तुमचा शत्रू किंवा प्रतिस्पर्ध्याला खूप कमकुवत समजू लागाल. तुमच्या शत्रूकडेही तुमच्याबद्दल अनेक प्रकारची माहिती असेल हे लक्षात ठेवा. त्यामुळे शत्रूला कधीही कमजोर समजू नका.

7. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार राहा 

चाणक्य म्हणाले की मोठ्या ध्येयासाठी खूप तयारी करावी लागेल आणि कोणत्याही परिस्थितीत असे ध्येय साध्य करण्यासाठी आणखी वेळ लागेल. यासाठी तुम्हाला मानसिक आणि शारीरिक तयारी करावी लागेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Chanakya Niti : माणसाला कठोर परिश्रमाशिवायसुद्धा यश मिळू शकतं; चाणक्यांनी सांगितलं यशस्वी जीवनाचं रहस्य