Ind vs SA 1st T20 Playing XI: भारताने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. आता भारत आणि दक्षिण अफ्रिका (india vs South Africa 1st T20) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका रंगणार आहे. यामधील पहिला टी-20 सामना 9 डिसेंबरला कटकमधील बाराबती मैदानावर खेळवण्यात येईल. एकदिवीस मालिकेनंतर आता टी-20 मालिका जिंकण्याचा प्रयत्न भारताकडून होईल.

Continues below advertisement

7 खेळाडू बाहेर, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या परतले- (Ind vs SA 1st T20 Playing XI)

एकदिवसीय मालिकेच्या तुलनेत, पहिल्या टी-20 मधून 7 खेळाडू बाहेर असतील. यामध्ये रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली, परंतु ते टी-20 मालिकेचा भाग नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपकर्णधार शुभमन गिल तंदुरुस्त आहे. पहिल्या टी-20 मध्ये तो अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करेल. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही संघात परतेल. संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची असा प्रश्न प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यासमोर असणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना तुम्ही कुठे पाहू शकता? (Ind vs SA T20 Free Watch)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सर्व सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर टीव्हीवर पाहू शकता. मोबाईलवर सामने पाहणारे प्रेक्षक जिओहॉटस्टारवर टी-20 मालिकेतील सर्व सामने थेट पाहू शकतात.

Continues below advertisement

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: (Ind vs SA 1st T20 Playing XI)

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा/अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.

टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ- (Ind vs SA T20 Team India Squad)

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Rupali Patil On Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding Called Off: स्मृती मानधना अन् पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; आता रुपाली पाटलांची एन्ट्री, नेमकं काय म्हणाल्या?