Chanakya Niti : चाणक्य नीती (Chanakya Niti) आपल्या आयुष्याच्या प्रत्येक घटनांवर भाष्य करते. प्रत्येक नातं असोत किंवा जीवनाचा महत्त्वाचा पैलू चाणक्य नीती नेहमी आपल्याला चेतावणी देते, मार्गदर्शन करते. सतर्क करते. असं म्हणतात की, जे लोक आचार्य चाणक्य यांचे विचार पाळतात तर त्यांना आयुष्यात नक्कीच यश मिळतं. इतकंच नाही तर देवी लक्ष्मीचीही त्यांच्यावर सदैव कृपा असते.
आजची चाणक्य नीती 'मैत्री' वर भाष्य करणारी आहे. सर्व नातेसंबंधांमध्ये मैत्री सर्वात मजबूत असते असं म्हणतात. माणसाला जन्मत:अनेक नाती मिळतात. जसे की, मुलगा,मुलगी,दादा,ताई, पुतण्या, पुतणी इ..पण मैत्रीचं नातं हे असं नातं आहे जी माणूस स्वत:हून निर्माण करतो.म्हणूनच मैत्री ही सर्वात श्रेष्ठ मानली जाते.पण मैत्रीच्या संदर्भात आचार्य चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण हात मिळणारी प्रत्येक व्यक्ती तुमचा मित्र असेलच असे नाही.
मैत्री करताना सावधगिरी बाळगा
आचार्य चाणक्य म्हणतात की, मैत्री करताना नेहमी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. परिस्थिती कोणतीही असो मित्राला कधीच आपली सगळी परिस्थिती सांगायची नसते. कारण योग्य मित्र जर विश्वासू नसेल तर त्याच्यामुळे तुम्हाला जास्त धोका बसू शकतो. त्यामुळेच स्वार्थी मित्रांपासून नेहमी दूर राहा. कारण अशा लोकांना फक्त तुमचा फायदा घ्यायचा असतो. त्यांना तुमचं सुख, कल्याण पाहायचं नसतं, तर वेळेचा फायदा घ्यायचा असतो. तुमच्या आयुष्यात जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा सर्वात आधी हे लोक बाजूला होतील.
स्वार्थी मित्रांपासून दूर राहा
चाणक्य नीतीमध्ये असं म्हटलंय की, नेहमी स्वार्थी आणि लोभी मित्रांपासून दूर राहा.कारण असे लोक स्वत:चाच विचार करतात. आपला हेतू साध्य करण्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात.चाणक्य नीती येथे सावध राहण्यास सांगतात.मिठी मारणारा आणि हात मिळवणारा प्रत्येकजण मित्र असू शकत नाही. जे लोक याकडे लक्ष देत नाहीत ते नेहमी दुखावतात.
मूर्ख मित्रांना जवळ घेऊ नका
चाणक्य नीतीत असं म्हटलंय की, मित्र नेहमी हुशार बनवा. कारण मूर्ख मित्र तुम्हाला कधी फसवेल हे कोणालाच कळणार नाही. त्यामुळे असे मित्र बनवा की ज्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी शिकता येईल. जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्हाला काहीतरी शिकवणाऱ्या मित्रापेक्षा हुशार शत्रू अनेक पटींनी चांगला असतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: