Chanakya Niti For Men : आचार्य चाणक्यांनी समाजाला शहाणं बनवण्यासाठी नीती ग्रंथ ‘चाणक्य नीती’मध्ये (Chanakya Niti) अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या मनुष्याला जीवनाचे मार्गदर्शन करतात. जीवनात उच्च यश मिळवण्यासाठी काय करावं? हे देखील चाणक्यांनी सांगितलंय. पुरुषांनी काही गोष्टी या कोणाशीही शेअर करू नये, असं चाणक्य म्हणतात, अन्यथा जग तुमच्यावर हसू शकतं. पुरुषांनी नेमक्या कोणत्या गोष्टी गुप्त ठेवाव्या? जाणून घेऊया.


श्लोकअर्थनाशं मनस्तपं ग्रह्ये दुश्चरितानि च ।
वंचन चाआपमानं च मतिमान् प्रकाशेयत् ।


बुद्धीमान व्यक्तीने आपली संपत्ती, मानसिक दु:ख, घरातील समस्या, कोणाकडून फसवणूक होणं आणि आपला झालेला अपमान या गोष्टी कोणालाही सांगू नयेत. आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यांनुसार, भविष्यात या गोष्टी समोरचा तुमच्या विरोधात वापरू शकतो.


आर्थिक नुकसान


आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला आर्थिक नुकसान झालं तर ते कधीच जाहीर करू नका. कारण तुम्हाला आर्थिक नुकसान झाल्यावर काही लोक तुमच्यासमोर दु:ख व्यक्त करतील, पण वास्तवात त्यांना पराकोटीचा आनंद झालेला असेल. तुमच्या पाठीमागे ते तुमच्यावर हसून तुमचा आनंद घेतील. समाजात तुमचा मान कायम राहू द्यायचा असेल तर आर्थिक नुकसानीची चर्चा करू नका, काही लोक तुम्हाला यामुळे मुर्ख देखील समजू शकतात. 


घरातील वाद


घरात वाद झाले तर ते घरातच मिटवले पाहिजे. काहींना घरातील वाद चव्हाट्यावर आणण्याची सवय असते. काही जण घरातील वाद मित्रांसोबत किंवा इतर लोकांसोबत शेअर करतात, पण ही गोष्ट टाळली पाहिजे. कारण यामुळे लोक तुमच्या कुटुंबाला जज करु शकतात, नावं ठेवू शकतात. यामुळे तुमचं नाव देखील खराब होऊ शकतं आणि लोक तुमच्यावर हसू शकतात.


अपमान


आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, जर तुमचा कधी कोणी अपमान केला असेल, तर याची कोणासमोर वाच्यता करू नये. कारण तुम्ही ज्या व्यक्तीला ही गोष्ट सांगाल, ती व्यक्ती तुमच्याबाबत चुकीचा विचार करू शकते. मग ती पत्नी का असेना किंवा पती का असेना.


तुमची झालेली फसवणूक


अनेकवेळा कशा ना कशाच्या बाबतीत आपली फसवणूक जाते. आचार्य चाणक्य यांच्या मते, ही गोष्ट देखील कोणाशी शेअर करू नये. यामुळे लोक तुमच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात किंवा कोणीही तुम्हाला सहज फसवू शकेल, अशी प्रतिमा ते त्यांच्या मनात निर्माण करू शकतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Numerology : अतिशय तापट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; अगदी क्षणात होतात हायपर, नेहमी नाकाच्या शेंड्यावर असतो राग