Chanakya Niti : आचार्य चाणक्य (Chanakya Niti) म्हणतात की, ज्यांचे जीवन शिस्तबद्ध असते, यश त्यांचे दार नक्की ठोठावते. माणसाचे जीवन तेव्हाच सार्थक होते जेव्हा तो आपले काम आणि जबाबदाऱ्या यात समतोल राखतो. आचार्य चाणक्य म्हणतात की, वृद्धापकाळ हा जीवनाचा एक महत्वाचा टप्पा आहे. जिथे प्रत्येक व्यक्तीला आनंदी आणि आरामदायी जीवन जगायचे असते. चाणक्‍यांनी सांगितले आहे की, वृद्धापकाळात सुख-शांती मिळवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. ज्यामुळे तुमचे आयुष्य नेहमी निरोगी आणि आनंदी राहण्यास मदत होईल.


पैशाचा चांगला वापर


पैसा ही अशी गोष्ट आहे. जी स्वतः आणि इतरांमधील फरक स्पष्ट करते. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, तोपर्यंत तुमच्या नातेसंबंधांवर सर्वत्र मान असेल, पण जेव्हा पैशाची कमतरता असते तेव्हा तुम्ही तुमची साथ कोणीही देत नाही. जेव्हा माणसाचे म्हातारपण येते, तेव्हा हे दु:ख आणखीनच वाढते, म्हणूनच चाणक्य म्हणतात की, पैशाचा सदुपयोग करा. पैसे वाचवले तर म्हातारपणात कुणासमोर हात पसरायची गरज नाही.


शिस्त


माणसामध्ये आत्मविश्‍वास शिस्त आणि सरावातून येतो. चाणक्य सांगतात की, जी लोकं आपली सर्व कामे वेळेवर करतात, आपली दिनचर्या शिस्तबद्धपणे जगतात, त्यांना कधीही कोणावर अवलंबून राहावे लागत नाही. तो त्याचे प्रत्येक ध्येय साध्य करतो. चाणक्यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला सुरुवातीपासूनच योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने काम करण्याची सवय असेल तर त्यांना वृद्धापकाळात त्रास सहन करावा लागत नाही. खाणे, झोपणे, ठराविक वेळेत उठणे, व्यायाम करणे, प्रत्येक काम माणूस ठराविक वेळापत्रकानुसार करतो. जे चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे शिस्त कधीही सोडू नये. असे म्हणतात की, ज्यांच्यात एकटे आणि शिस्तीने चालण्याची हिंमत असते, त्यांच्या मागे एक दिवस संपूर्ण जग असते.


निःस्वार्थपणा


चाणक्य म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती निःस्वार्थपणे एखाद्याला मदत करते, तेव्हा तो आयुष्यात कधीही दुःखी आणि अस्वस्थ राहत नाही. दान आणि दया हा सर्वात मोठा धर्म आहे. तुमची आजची मदत तुमचा भविष्य घडवते. म्हातारपण सुख-शांततेने जाते. मदतीसाठी आपले हात नेहमी पुढे ठेवा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


संबंधित बातम्या


Chanakya Niti : असे कर्मचारी ऑफिसमध्ये सगळ्यांना प्रिय असतात, कोणतीही समस्या क्षणार्धात सोडवतात, चाणक्य म्हणतात..