Chanakya Niti : कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी कुटुंबप्रमुखाची (Family Head) भूमिका खूप महत्त्वाची असते. आचार्य चाणक्य (Chanakya) म्हणतात की, कुटुंबातील प्रमुखाचे स्थान सर्वात महत्वाचे आहे, कारण त्याचा एक निर्णय संपूर्ण कुटुंबाचे भविष्य घडवू शकतो किंवा क्षणात खराबही करू शकतो. चाणक्यांनी सांगितले की, जर घराच्या प्रमुखाला या 3 सवयी असतील तर त्याच्या कुटुंबाचे कोणतेही नुकसान होऊ शकत नाही. (Chanakya Niti In Marathi)



तुम्ही जे पाहता त्यावर विश्वास ठेवा..


घरच्या प्रमुखाची म्हणजेच कुटुंबप्रमुखाची जबाबदारी खूप वाढली आहे. प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवतो. अशा स्थितीत त्याने कोणत्याही लहान-मोठ्या विषयातील प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच त्याविषयी मत बनवावे, कारण जे लोक इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात, त्यांचे कुटुंब विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही, यावेळी प्रत्येक वळणावर त्यांची फसवणूक होते. जे आपल्या समंजसपणाने आणि समजूतदारपणे प्रश्न सोडवतात, त्यांच्या कुटुंबाच्या सुख-शांतीला कोणीही धक्का लावू शकत नाही.


 


पैशाचे व्यवस्थापन


कुटुंबप्रमुख जर पैसे पद्धतशीरपणे खर्च करत असेल, अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवत असेल. तर संकटातही त्याचे कुटुंब एकत्र राहते. त्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. या एका सवयीमुळे संकटकाळीही कुटुंबाचा आनंद अबाधित राहतो.


 


ठाम राहा


आचार्य चाणक्य म्हणतात की, कुटुंबाचा प्रमुख हा रांगेत उभा असलेल्या पहिल्या व्यक्तीसारखा असतो. एक जण उभा राहतो, रांगेतले बाकीचे लोकही त्याच पद्धतीने उभे राहतात. म्हणजेच नेहमी चांगली कामे करण्याची घरप्रमुखाची भावना आणि विचार करून घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहण्याची सवय कुटुंबाचे भविष्य सुधारते. कुटुंबातील सदस्यांमध्ये शिस्त ठेवण्यासाठी घराच्या प्रमुखाने आपल्या निर्णयांवर ठाम राहणे आवश्यक आहे.


 



आचार्य चाणक्याच्या अनुभवांचा संग्रह 
आचार्य चाणक्य  यांनी जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्या अनमोल विचारांचा ठेवा तयार केला आहे. ज्याचे नाव आहे चाणक्य नीतिशास्त्र. हा आचार्य चाणक्याच्या अनुभवांचा संग्रह आहे, जो माणसाला प्रत्येक पावलावर मदत करतो. जे त्यांचे अनुकरण करतात, ते जीवनातील आव्हानांना चांगल्या मार्गाने तोंड देऊ शकतात. तसेच जीवनात न डगमगता यशाच्या मार्गावर चालतात.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Chanakya Niti : यश मिळवण्यासाठी तुम्हाला 'या' कडू झाडाची दोन फळे चाखायला लागतील, चाणक्यनीती मध्ये काय म्हटलंय...