Chanakya Niti : आचार्य चाणक्य (Chanakya)आपल्या बुद्धिमत्तेसमोर सर्वात मोठ्या शत्रूलाही नतमस्तक होण्यास भाग पाडत असत. चाणक्य म्हणतात की, शत्रूचे दोन प्रकार आहेत, एक जे आपण पाहू शकतो आणि दुसरे जे अदृश्य आहेत, तसेच गुप्तपणे हल्ला करतात. शत्रूचा पराभव करायचा असेल तर चाणक्यानी काही गोष्टी सांगितल्या आहेत. शत्रूंना पराभूत करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घ्या 


 


अनुलोमेन बलिनं प्रतिलोमेन दुर्जनम्।
आत्मतुल्यबलं शत्रु: विनयेन बलेन वा।।


 


शत्रू जर तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली असेल तर...
आचार्य चाणक्यांनी या श्लोकाद्वारे सांगितले आहे की, शत्रूचे वागणे समजून घेऊन त्याच्यावर हल्ला केला पाहिजे. म्हणजेच शत्रू जर तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली असेल तर त्याच्या बाजूने विचार करून, वागून त्याचा पराभव केला जाऊ शकतो. शत्रू दुर्बल असेल किंवा कपटी स्वभावाचा असेल तर त्याच्या विरुद्ध वागावे.



शत्रूचा पराभव करायचा असेल तर..
जर शत्रू तुमच्यासारखाच बलवान असेल तर त्याला तुमच्या बोलण्यामध्ये अडकवा, म्हणजे तो बाहेर पडू शकणार नाही. जर तुम्हाला शत्रूचा पराभव करायचा असेल तर त्याच्या बद्दलच्या प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवा. शत्रू नेहमी तुमच्या निष्काळजीपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे तुम्ही सदैव सतर्क राहावे.



कमजोरीचा फायदा 


चाणक्य म्हणतात की, एखादी व्यक्ती सूडाच्या भावनेत इतकी गुंतून जाते की ती स्वत:च्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा प्रकारे तो स्वतःचे नुकसान करतो. तुमच्या या कमजोरीचा फायदा शत्रू घेतात.



क्रोधाचा अग्नी करतो बुद्धीचा नाश
एक उदाहरण देताना चाणक्य म्हणाले की, ज्याप्रमाणे लाकडात असलेला अग्नी संपूर्ण जंगल नष्ट करतो, त्याचप्रमाणे माणसाच्या आत जळणारा क्रोधाचा अग्नी बुद्धीचा नाश करतो, रागाच्या माणसाची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती शून्य होते. आणि याचा फायदा शत्रू घेतात. शत्रूसमोर तुमचा पराभव दिसत असला तरी शत्रूला त्याचा सुगावाही लागू देऊ नका. धीर धरा. मन शांत ठेवल्यास शत्रूवर हल्ला करण्याची शक्ती विकसित होईल.



तुमच्या योजना सांगू नका


चाणक्यनीती सांगते की, जेव्हा तुम्हाला शत्रूचा पराभव करायचा असेल, तेव्हा तुमची रणनीती जगाला कळू देऊ नका. अशा वेळी माणसाने आपल्या योजनांबाबत गंभीर असले पाहिजे. शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा आणि स्वतःचे नियोजन पुढे करा, जे तुमचे खरे सोबती आहेत. त्यांनाच मदतीसाठी तुमच्या सोबत ठेवा. तुमची योजना सगळ्यांना सांगितल्या तर शत्रूपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Chanakya Niti : यश मिळवण्यासाठी तुम्हाला 'या' कडू झाडाची दोन फळे चाखायला लागतील, चाणक्यनीती मध्ये काय म्हटलंय...