Chanakya Niti: दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक गोष्टी करतो. ज्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. हिंदू धर्मात अशा अनेक गोष्टींबद्दल विस्तृत वर्णनही करण्यात आले आहे. आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ आणि सल्लागार म्हणून ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांनी त्यांचे विचार चाणक्यनीती नावाच्या शास्त्रामध्ये रूपांतरित केले, ज्याला आज चाणक्य नीती म्हणून ओळखले जाते. या नीती शास्त्रामध्ये चाणक्याने मानवजातीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या आणि सखोल विषयांवर चर्चा केली आहे आणि त्यांचे तपशीलवार वर्णन केले आहे. हे विचार व्यक्तीच्या जीवनात अमलात आणले तर व्यक्तीला यशस्वी, समृद्ध आणि चांगले जीवन मिळू शकेल. असं चाणक्यनीतीत म्हटलंय. जाणून घेऊया..

ती कोणती कामे आहेत? ज्यानंतर अंघोळ करावी..

आचार्य चाणक्यांच्या या चाणक्य सूत्रांमध्ये श्लोकांच्या माध्यमातून अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जीवनात अशी काही कामे आहेत, जी केल्यानंतर आपल्याला स्नान करणे आवश्यक आहे. जर तुम्ही असे केले नाही तर त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो आणि शिवाय तुम्ही राक्षसी, चांडाळ वृत्तीचे बनता. चाणक्यनीतीनुसार जाणून घेऊया ती कोणती कामे आहेत? ज्यानंतर स्नान करणे खूप महत्वाचे मानले जाते. चाणक्य नीतीमध्ये म्हटलंय..

तैलाभ्यङ्गे चिताधूमे मैथुने क्षौरकर्मणि।तावद् भवति चाण्डालो यावत् स्नानं न चाचरेत्।

स्मशानभूमीतून आल्यानंतर..

चाणक्यनीतीनुसार, स्मशानभूमीतून आल्यानंतर व्यक्तीने स्नान करावे. कारण जेव्हा तुम्ही स्मशानभूमीतून अंतिम संस्कारासाठी परतता तेव्हा तुमचे शरीर अपवित्र होते. अशा परिस्थितीत आंघोळ न करता घरात राहिल्याने नकारात्मकतेवर परिणाम होतो.

तेल मालिश केल्यानंतर..

चाणक्यनीतीनुसार जेव्हाही तुम्ही मसाज करून घरी परतता तेव्हा सर्वात आधी स्नान करा. यामुळे तुम्हाला फ्रेश तर वाटेलच पण तुमच्या शरीरातील घामही निघून जाईल.

केस कापल्यानंतर..

आचार्य चाणक्यांच्या चाणक्यनीतीनुसार जेव्हा तुम्ही केस कापून घरी परतता तेव्हा तुम्ही आंघोळ केल्याशिवाय राहू नये, कारण जेव्हा तुम्ही तुमचे केस कापता तेव्हा ते तुमच्या संपूर्ण शरीरावर चिकटून राहतात आणि जर तुम्ही आंघोळ न करता राहिल्यास तुमचे केस सर्वत्र पडून तुम्हाला चिकटून राहतील, नंतर तुम्हाला त्रास देतील, तसेच कधी कधी हे केस नकळत तुमच्या पोटात शिरले तर तुमची पचनक्रिया खराब होईल. त्यामुळे केस कापल्यानंतर आंघोळ करणे गरजेचे आहे.

शारिरीक संबंधांनतर..

आचार्य चाणक्य यांच्यानुसार शारीरिक संबंध ठेवल्यानंतर स्त्री आणि पुरुष दोघांनीही स्नान करणे आवश्यक आहे. कारण शारीरिक संबंधानंतर आंघोळ केली नाही तर संसर्गाचा धोका वाढतो.

हेही वाचा>>>

Shani Transit 2025: मार्चमध्ये शनि, सूर्यासह अनेक मोठे ग्रह ठरणार गेमचेंजर! मेष, कन्यासह 'या' 5 राशींच्या सुख-संपत्तीत होणार वाढ 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )