Chanakya Niti : चाणक्य नीतिचा (Chanakya Niti) वापर आजही अनेकजण करतात. वैायक्तिक आयुष्यात यश मिळविण्यासाठी चाणक्य नीतिचा अवलंब केला जातो. त्याचप्रमाणे, विवाह हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. योग्य आणि मनासारखा जोडीदार मिळावा असं प्रत्येकालाच वाटतं.
असं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा म्हणजेच पत्नीचा हात असतो. पण, जर पत्नीत काही अवगुण असले तर पतीबरोबरच संपूर्ण कुटुंबियांचंही नुकसान होतं. त्यामुळेच आचार्य चाणक्य यांनी या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ते जाणून घेऊयात.
आपल्या सौंदर्यावर घमंड करणारी
चाणक्यांच्या मते, जर एखादी मुलगी आपल्या बौद्धिक क्षमते व्यतिरिक्त जर स्वत:च्या सुंदरतेचा माज करत असेल तर अशी मुलगी ज्या घरात जाईल ते घर उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या मुली स्वत:असंतुष्ट असतात त्या इतरांना संतुष्ट ठेवू शकत नाहीत.
भौतिक सुख-सुविधांचा विचार करणारी
चाणक्य यांचं असं मत आहे की, ज्या मुली भोतिक सुख-सुविधेला प्राधान्य देतात त्या मुली किंवा पत्नी पतीच्या मनाचा कधीच विचार करत नाहीत. अशा मुलींशी लग्न कधीच करू नये.कारण अशा मुलींना इतरांपेक्षा स्वत:चाच विचार करायला आवडतं.
नेहमी दुसऱ्यांचा अपमान करणारी
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, ज्या महिला, मुली, स्त्रिया सतत दुसऱ्यांचा अपमान करतात अशा स्त्रियांशी कधीही लग्न करू नये. अशा मुली कधीच आपल्या कुटुंबियांना मान-सन्मान देऊ शकणार नाहीत.
असत्याच्या मार्गावर चालणाऱ्या मुली
चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या मुलींना सतत खोटं बोलण्याची, वाईट मार्गावर चालण्याची सवय असते तर अशा मुलींना एखाद्याचं घर उध्वस्त करायला वेळ लागत नाही. या मुलींना फक्त पतीला भडकावता येतं त्यामुळे असल्या मुली दूर असलेल्याच बऱ्या असतात.
दगा देणाऱ्या मुली
आचार्य चाणक्य यांनी मुलींचा शेवटचा अवगुण सांगताना असं म्हटलंय की ज्या मुलींना इकरांना त्रास द्यायला, धोका द्यायला किंवा आपल्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करतात अशा मुली कधीच कुटुंबात एकता आणू शकत नाहीत. अशा मुलींपासून दूर राहणंच योग्य असतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: