Chanakya Niti : आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी आपल्या आयुष्यातील संकटांना पार करण्यासाठी नीतीशास्त्रात काही महत्त्वाचे विचार सांगितले आहेत. या विचारांचं पालन केल्यास मनुष्य जीवनात येणाऱ्या संकाटांना न डगमडता त्यांना धैर्याने सामोरं जाऊन एक चांगलं आयुष्य जगू शकतो. आचार्य चाणक्य यांनी आपल्या मूल्यात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मनुष्याला आजच्या काळात उपयोगी पडू शकतात. आचार्य चाणक्य यांचे असे कोणते 10 विचार आहेत ते जाणून घेऊयात. 


नात्यन्तं सरलैर्भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम् ।


छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः ।। 


1. मनुष्याने कधीच साधं, सरळ असू नये. या वाक्याचं उदाहरण देताना चाणक्य म्हणतात की, जंगलात जी झाडं सुंदर आणि सरळ असतात त्यांना तोडण्यात कोणत्याच अडचणी येत नाहीत. त्यामुळे त्यांना सर्वात आधी तोडलं जातं. 


2. चाणक्य म्हणतात की, जगात आपला टिकाव राहावा म्हणून पैसा हे एकमेव साधन आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याजवळ सगळं काही आहे. माणसाकडे जर पैसा असेल तर त्याला खरी व्यक्ती मानली जाते. श्रीमंत असल्याने ती व्यक्ती मूर्ख असली तरी तिला बुद्धिमान, विद्वान आणि योग्य मानले जाते. 


3. राग मृत्यूला आमंत्रण देतो. लोभ दु:खाला आमंत्रण देतो. तेच शिक्षण हे दूध देणाऱ्या गायीसमान आहे. जे मनुष्याची प्रत्येक वेळी सुरक्षा करते. या व्यतिरिक्त आचार्य चाणक्य म्हणतात की, जी व्यक्ती संतुष्ट असते ती कधीही सरळ जीवन जगू शकते. 


4. चाणक्य म्हणतात की, बुद्धिमान व्यक्तीला आपला वेळ वाचन, शिक्षण आणि चिंतन करण्यात व्यतीत केला पाहिजे. 


5. ज्या व्यक्तीला शिस्त नसते ती व्यक्ती नेहमी दु:खात असते. आणि दुसऱ्यांना सुद्धा दु:ख देते. आचार्य म्हणतात की, अशी व्यक्ती समाजात राहात असेल तर त्या स्वत: नियम तर मोडतातच पण त्याचबरोबर दुसऱ्यांसाठी आणि स्वत:साठी अनेक अडचणी निर्माण करतात. 


6. चाणक्य म्हणतात की, एक स्त्री पुरुषाच्या तुलनेने दोन पटींना आहार घेते. चार पटींनी ती बुद्धिमान आणि चालाख असते. तर सहा पटींनी साहसी असते. 


7. आपली गुपितं कोणालाही सांगू नका. चाणक्य म्हणतात की, ही सवय तुम्हाला खूप नुकसान पोहोचवेल. 


8. चाणक्य म्हणतात की, प्रत्येक मैत्रीच्या मागे कोणता ना कोणता स्वार्थ असतो. अशी कोणतीच मैत्री नाही ज्यात स्वार्थ नाही. हे एक कटू सत्य आहे असं चाणक्य सांगतात. 


9. चाणक्य म्हणतात की, शिक्षण ही सगळ्यात चांगली मैत्री आहे. एक शिक्षित व्यक्ती प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळवतो. 


10. आपले विचार मांडताना आचार्य पुढे म्हणतात की, आपल्याला पूर्वीच्या गोष्टी आठवून त्यावर खेद करू नये. आणि भविष्याला घेऊन देखील चिंतित राहू नये. चाणक्य म्हणतात की, बुद्धिवान व्यक्ती नेहमी वर्तमानकाळात जगते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Chanakya Niti : मूर्ख मित्रापेक्षा हुशार शत्रू चांगला! आचार्य चाणक्य असं का म्हणतात? कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल