Chanakya Niti: हिंदू धर्मात पत्नीला पतीची अर्धांगिनी म्हटले जाते. पतीच्या प्रत्येक सुख-दु:खात तिचा मोलाचा वाटा असतो. पती-पत्नीचे नातं टिकवून राहण्यासाठी त्यांच्यात एकमेकांबद्दल प्रेम, आदर, विश्वास, समजुतदारपणा असणं गरजेचं असतं. त्याच विश्वासापोटी काही महिला दिवसभरातील प्रत्येक गोष्ट आपल्या पतीला सांगतात. मात्र चाणक्यनीतीबाबत बोलायचं झालं तर, यानुसार कोणत्याही पत्नीने काही गोष्टी पतीसोबत शेअर करू नयेत. या गोष्टींमुळे नात्यात तणाव, गैरसमज किंवा संघर्ष निर्माण होऊ शकतो. जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सुखी आणि मजबूत ठेवायचे असेल तर तुम्ही चाणक्य नीतीच्या या सूचनांचे पालन केले पाहिजे.

पत्नीने 'या' गोष्टी  कधीही पतीसोबत शेअर करू नये

आचार्य चाणक्यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही, तरीसुद्धा ते एक महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतिकार होते. त्यांची धोरणे आजही जीवन चांगले बनविण्यास मदत करत आहेत. चाणक्यनीतीमध्ये नातेसंबंध, पैसा आणि समाजाशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत. ज्याचा अवलंब करून माणूस आपले जीवन चांगले बनवू शकतो.  त्याचप्रमाणे पती-पत्नीचे नाते दृढ करण्यासाठी काही गोष्टी चाणक्यनीतीमध्येही लिहिल्या आहेत. यासोबतच त्यांनी असेही सांगितले आहे की अशा काही गोष्टी आहेत ज्या पत्नीने कधीही पतीसोबत शेअर करू नये. काही गोष्टी गुप्त ठेवल्याने नात्यात विश्वास आणि आदर टिकून राहतो, असे आचार्य चाणक्यांचे म्हणणे होते. जाणून घेऊया पत्नीने कोणत्या गोष्टी पतीसोबत शेअर करणे टाळावे.

जुन्या नात्यांबाबत वाच्यता नका करू जसे की...

चाणक्यनीतीनुसार, पत्नीने काही गोष्टी अशा असतात, ज्या पतीपासून लपवून ठेवल्या तर त्यातच तुमचे हित असते. चाणक्य म्हणतात की भूतकाळ भूतकाळात सोडला पाहिजे. जर पत्नीने जुने मुद्दे मांडले तर त्यामुळे नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. महिलांनो चुकूनही पतीसोबत पूर्वीच्या नातेसंबंधांची किंवा प्रेम प्रकरणांची माहिती सांगू नये. ते नातं कितीही लहान किंवा जुने असले तरी अशा गोष्टींमुळे नवऱ्याच्या मनात शंका किंवा राग निर्माण होण्याची शक्यता असते. वैवाहिक जीवनात फक्त वर्तमान आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करणे चांगले. अनावधानाने कोणतेही जुने नाते किंवा भेटीगाठी आल्यास शांतपणे सामोरे जा. तुमच्या पतीला याबद्दल अजिबात सांगू नका.

माहेरच्या समस्या सांगू नये, जसे की..

चाणक्यनीतीनुसार, पत्नीने माहेरच्या कुटुंबातील कमकुवतपणा इतरांसमोर उघड केल्याने आदर कमी होतो. जसे की आईच्या घरातील काही वाद, आर्थिक समस्या किंवा वैयक्तिक समस्या असल्यास तिने पतीला सांगणे टाळावे. तिच्या पालकांच्या घरातील किंवा कुटुंबातील वैयक्तिक बाबी पतीसोबत शेअर करू नयेत. अशा गोष्टींमुळे तुमच्या पतीच्या मनात तुमच्या कुटुंबाबद्दल चुकीची धारणा निर्माण होऊ शकते. असे चाणक्य सांगतात. जर ते खूप महत्वाचे असेल तर आवश्यक तेवढेच सांगा.

तुमची कमजोरी कधीही सांगू नका, जसे की..

चाणक्यनीतीनुसार, कधी कधी तुमचा नवरा तुमच्या कमकुवतपणाचा तुमच्याविरुद्ध शस्त्र म्हणून वापर करू शकतो. म्हणून पत्नीने केवळ पतीकडेच नव्हे तर तिच्यातील कमजोरी कोणाकडेही उघड करू नये. तुमची कमजोरी दुसऱ्याला कळली तर लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. 

पत्नीच्या इच्छा किंवा स्वप्न जसे की..

चाणक्यनीतीत म्हटल्याप्रमाणे, पत्नीने योग्य वेळ येईपर्यंत अशा इच्छा गुप्त ठेवल्या पाहिजेत. म्हणूनच तिचे वैयक्तिक इच्छा किंवा स्वप्ने, जी अतिशय संवेदनशील असतात, तिच्या पतीसोबत शेअर करणे टाळले पाहिजे. उदाहरणार्थ, तुमच्या पतीच्या आर्थिक परिस्थितीशी किंवा विचाराशी जुळत नसलेली एखादी गोष्ट तुम्हाला हवी असल्यास, त्याला सांगण्यापूर्वी नीट विचार करा. अशा गोष्टींमुळे पतीवर दबाव येऊ शकतो किंवा त्याला कमकुवत वाटू शकते. चाणक्य म्हणतात की 

इतर लोकांच्या वैयक्तिक बाबी

चाणक्य म्हणतात की जे इतरांचे रहस्य उघड करतात त्यांना कमी आदर दिला जातो. अशा गोष्टी शेअर केल्याने तुमच्या नात्याची विश्वासार्हता कमी होऊ शकते. पत्नीने इतरांच्या वैयक्तिक बाबी, जसे की मित्र किंवा नातेवाईकांचे रहस्य पतीसोबत शेअर करू नये. जर एखादा मित्र किंवा नातेवाईक तुमच्यावर विश्वास ठेवत असेल आणि तुम्हाला काही सांगत असेल तर ते गोपनीय ठेवा. 

हेही वाचा :

तब्बल 100 वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला घडतोय 6 योगांचा महासंयोग, 'या' 3 राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार!

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)