Champashashthi 2025: भारतीय परंपरेतील मुख्य सणांपैकी एक चंपाषष्ठीचा सण... मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिवाच्या मार्कंडेय रूपाची पूजा केली जाते. या वर्षी आज बुधवार, 26 नोव्हेंबर 2025 रोजी दिवस साजरा केला जातोय. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रासह कर्नाटक आणि  दक्षिणेकडील राज्यांमध्ये साजरा केला जातो. स्कंद पुराणातही या दिवशी भगवान कार्तिकेयची पूजा महत्त्वाची असल्याचे नमूद आहे. भगवान शिवाच्या मार्कंडेय रुपाची पूजा विधी, शुभ मुहूर्त, तळी भरण्याचे महत्त्व, पौराणिक कथा जाणून घ्या...

Continues below advertisement

चंपाषष्ठी कशी साजरी केली जाते? कोणता नैवेद्य दिला जातो?

मार्गशीर्षाच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवसाला चंपाषष्ठीला साजरी केली जाते. हाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जिथे भगवान शिवाच्या मार्कंडेय रूपाची पूजा केली जाते. या दिवशी भगवान खंडेरायांना वांग्याचे भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य अर्पण केला जातो. भगवान खंडोबा ज्यांचे कुलदैवत आहे, त्यांच्याकडे कुलाचाराप्रमाणे आधीचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी खंडोबाची महाभिषेकयुक्त षोडशोपचार पूजा करून महानैवेद्य दाखवतात. या सहा दिवसात मल्हारी महात्म्य या ग्रंथाचे वाचन करतात. देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवतात. याशिवाय, या दिवशी भगवान कार्तिकेयची देखील पूजा केली जाते. 

चंपाषष्ठी 2025 शुभ मुहूर्त

षष्ठी तिथी - रात्री 10:56 वाजेपासून (25 नोव्हेंबर 2025)                 रात्री 12:01 वाजेपर्यंत (27 नोव्हेंबर 2025)  असणार आहे. उदय तिथीनुसार चंपाषष्ठी बुधवार, 26 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे. पूजेचा शुभ/विजय मुहूर्त दुपारी 1:54 ते दुपारी 2:36 वाजेपर्यंत असणार आहे. 

Continues below advertisement

जेजुरीला मोठा उत्सव...

चंपाषष्ठीच्या दिवशी जेजुरी येथील खंडोबा मंदिरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने खंडोबा देवाला भंडारा म्हणजेच हळद, फळे, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरीचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो. इथे मोठी जत्राही भरवली जाते.

तळी भरण्याचे महत्त्व

चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचार समजला असतो, त्यामुळे घरोघरी तळी भरली जाते. ताम्हणामध्ये भंडारा पसरून त्यावर 5 विड्याची पाने, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे तसेच मधोमध भंडारा खोबऱ्याची वाटी ठेवली जाते. 5 मुले किंवा पुरुषांना बोलावून हा घट उचलला जातो आणि 3 वेळा येळकोट येळकोट म्हणून तळी उचलली जाते. त्यानंतर तळी भंडारा आणि दिवटी बुधले प्रज्वलित केली जाते.

मणि आणि मल्ल या 2 राक्षसांचा वध...

चंपाषष्ठीशी संबंधित लोकप्रिय आख्यायिका अशी आहे की, प्राचीन काळी मणि आणि मल्ल नावाचे दोन राक्षस भाऊ होते. मानवजातीला त्यांच्या अत्याचारांपासून मुक्त करण्यासाठी, भगवान शंकराने खंडोबाचा अवतार घेतला. आणि या राक्षसांशी सहा दिवस युद्ध केले आणि त्यांचा वध केला. याच ठिकाणी भगवान शिव मार्कंडेयाच्या रूपात प्रकट झाले. म्हणूनच महाराष्ट्रात भगवान शंकराच्या या अवताराला मार्तंड-मल्हारी म्हणून ओळखले जाते. खंडोबा, खंडेराया आणि इतर नावांनी देखील ओळखले जाते. मणि आणि मल्ल या राक्षसांच्या वधामुळे या दिवसाला चंपाषष्ठी असेही म्हणतात.

चंपाषष्ठीच्या दिवशी पूजा पद्धत

षड् रात्रोत्सव (सहा रात्रींचा उत्सव) - चंपाषष्ठीच्या आधी सहा दिवस उत्सव केला जातो. आणि याची सांगता म्हणून षड् रात्रोत्सव अशी विशेष पूजा आणि जागरण केले जाते.तेल आणि भंडारा - या काळात देवाला तेलाचे स्नान घालण्याची आणि 'भंडारा' (हळद) उधळण्याची प्रथा आहे. भंडारा हे समृद्धी, आरोग्य आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते.

हेही वाचा

Horoscope Today 26 November 2025: आज चंपाषष्ठीचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली! खंडेराया करतील संकटमुक्त, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)