Dhule : यंदा उद्या, म्हणजेच 23 एप्रिलला चैत्र पौर्णिमा (Chaitra Pournima 2024) आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ असलेल्या खानदेशच्या देवी एकविरेच्या यात्रोत्सवास (Khandesh Sri Ekvira Devi) सुरुवात होत आहे, या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे, 22 एप्रिलला चैत्रशुद्ध चतुर्दशीला देखील लाखो भाविकांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतलं, चैत्र शुद्ध चतुर्दशीनिमित्त मंदिरात असंख्य गर्दी झाली होती.


खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात भाविकांची मांदियाळी


महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशीला महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.नवस फेडण्यासाठी, तसेच लहान मुलांचं जावळ काढण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.


सालाबादप्रमाणे यंदाही खानदेश एकविरा मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. चैत्रशुद्ध चतुर्दशीला मंदिरात एक ते दीड लाख भाविकांनी गर्दी केली होती, यावेळी मंदिर परिसरात भाविकांची झालेली गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून विविध सोयीसुविधा देखील पुरवण्यात आल्या, तसेच मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.


चैत्र पौर्णिमा 2024 कधी? (When Is Chaitra Pournima 2024?)


चैत्र पौर्णिमा 23 एप्रिलला पहाटे 03:25 वाजता सुरू होईल आणि 24 एप्रिल रोजी पहाटे 05:18 वाजता समाप्त होईल. चैत्र पौर्णिमेची उदयतिथी 23 एप्रिल आहे, म्हणजेच त्या दिवशी चैत्र पौर्णिमेचा सूर्योदय होईल आणि चैत्र पौर्णिमेचा चंद्रोदयही त्याच दिवशी होईल. अशा स्थितीत चैत्र पौर्णिमा व्रत आणि स्नान 23 एप्रिलला केलं जाईल. 24 एप्रिलला पहाटे 05:18 वाजता पौर्णिमा तिथी समाप्त होईल.


चैत्र पौर्णिमा 2024 मुहूर्त (Chaitra Pournima 2024 Shubh Muhurta)


ब्रह्म मुहूर्त : पहाटे 04:20 ते 05:04
अभिजीत मुहूर्त : सकाळी 11:53 ते दुपारी 12:46
चंद्र उदय : संध्याकाळी 06:25 वाजता
चंद्र पूजेची वेळ : संध्याकाळी 06:25 नंतर


चैत्र पौर्णिमेचं महत्त्व (Chaitra Pournima Importance)


श्री हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी राजा केसरी नंदन आणि आई अंजनी यांच्या पोटी झाला. चैत्र पौर्णिमेला जो बजरंगबलीची पूजा करतो, सुंदरकांड, हनुमान चालीसा, रामायणाचे पठण करतो, त्याला सुख-समृद्धी लाभते. श्री हनुमान स्वतः प्रत्येक संकटात त्याचं रक्षण करतात, तसेच हनुमानभक्तांना जीवनात ऐश्वर्य प्राप्त होतं. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आचरण शुद्ध ठेवावं. या दिवशी कोणासाठीही अपशब्द वापरू नयेत. असं मानलं जातं की, यामुळे चंद्र देव क्रोधित होतो.


हेही वाचा:


Chaitra Purnima 2024 : चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नका 'ही' कामं; होतील विपरीत परिणाम