Chaitra Amavasya 2024 : चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya 2024) हा दिवस पितरांच्या पूजेसाठी शुभ दिवस मानला जातो. या दिवशी घातलेलं श्राद्ध आणि ब्राम्हण भोजनामुळे पितरांनी शांति मिळते आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद लाभतो. पूजा, स्नान आणि पितरांना नैवेद्य दाखवणं इत्यादी दृष्टीकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे.

Continues below advertisement


अमावस्येची (Amavasya) रात्र ही खूप भीतीदायक असते, म्हणून हिंदू धर्मात या रात्रीला निशाचरी रात्र म्हणजेच काळी रात्र म्हणतात. अमावस्येच्या रात्री (Amavasya Night) नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात, असं मानलं जातं. या दिवशी जादूटोणा, तंत्र-मंत्र, साधना-सिद्धी प्राप्त करणे यासारखी कामं केली जातात. त्यामुळे अमावस्येला लोकांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे आणि काही गोष्टी करणं टाळलं पाहिजे.


चैत्र अमावस्येला करा ही शुभ कामं (Chaitra Amavasya 2024 Do's)




  • उपवास करा




चैत्र अमावस्येला उपवास करावा. यामुळे अध्यात्मिक शिस्त लागते. आत्म-नियंत्रण राहते आणि आत्मविश्वास प्राप्त होतो.




  • दानधर्म करा




चैत्र अमावस्येच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैसे देऊन तुम्ही तुमच्या हातून सुकर्म करू शकता. या शुभ दिवशी उदारता आणि निःस्वार्थता दाखवणं शुभ मानलं जातं. पितृदोष निवारणासाठी चैत्र अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने गरजू लोकांना अन्नदान करावं.




  • घरातील वातावरण पवित्र ठेवा




या दिवशी तुमचं मन शांत ठेवा. तुमच्या घरातील वातावरण शांत राहू द्या. नको त्या विचारांपासून आणि कल्पनांपासून दूर राहून तुमची शारीरिक आणि मानसिक शुद्धता जपा. दिवाबत्ती, अगरबत्ती लावून घरातील वातावरण पवित्र ठेवा.




  • पाण्यात तीळ टाकून अंघोळ करा




चैत्र अमावस्येच्या दिवशी स्नानाला देखील विशेष महत्त्व आहे. या अमावास्येला पाण्यात तीळ टाकून अंघोळ केल्याने शनिदोष दूर होतात. या दिवशी स्नान करून सूर्याला अर्घ्य दिल्याने ग्रह दोष दूर होतात.




  • पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा




अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण करावं, यामुळे पितरांना मुक्ती मिळते. तसेच चैत्र अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने सर्व रोग दूर होतात.




  • अध्यात्मिक कार्यात व्यस्त राहा




मंत्रजप आणि इतर आध्यात्मिक कार्यात व्यस्त राहा. यामुळे पितरांना मुक्ती मिळते.


चैत्र अमावस्येच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामं (Chaitra Amavasya 2024 Don'ts)




  • मांसाहार टाळा




अमावस्येच्या दिवशी मांसाहार करणे अशुभ ठरतं, त्यामुळे मांसाहार टाळा. त्याऐवजी, सात्विक (शुद्ध) शाकाहारी जेवण जेवा.




  • वाद घालू नका




अमावस्येच्या संध्याकाळी किंवा रात्री घराच क्लेश करू नका, वाद घालू नका. नकारात्मक विचार करू नका.  दारू किंवा तंबाखूचं सेवन करू नका.




  • तुमचे केस किंवा नखं ​कापू नका




चैत्र अमावस्येला केस किंवा नखे ​​कापू नका, कारण ते नकारात्मक ऊर्जा घरात आणते आणि शुभकार्यात व्यत्यय येण्यास सुरुवात होते. केस-नखं कापण्यासाठी पुढच्या दिवसाची वाट पाहा.




  • सूर्यग्रहण चालू असताना झोपू नका




अमावस्येला रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं. अमावस्येला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावं आणि सूर्याला अर्घ्य द्यावं.




  • नवीन वस्तू खरेदी करणं टाळा




नवीन गोष्टींच्या खरेदीसाठी अमावास्येचा दिवस चांगला मानला जात नाही. या दिवशी नवीन कपडे, नवीन बूट, नवीन वाहन आणि कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणं टाळावं.




  • कोणतंही शुभ कार्य करणं टाळावं




अमावस्येच्या दिवशी कोणतंही शुभ कार्य करणं टाळावं. गृहप्रवेश, मुंडन, साखरपुडा आणि नवीन व्यवसाय सुरू करणं या दिवशी टाळावं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Shani Dev : 12 मेपासून 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस; शनि नक्षत्र बदलणार, घरात पैशांची आवक वाढणार