Capricorn Horoscope Today 29 May 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. बेरोजगारांनाही मित्राच्या मदतीने चांगला रोजगार मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. राजकारणात काम करणाऱ्यांना यश मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. तुमचे वर्तन उदार असेल आणि व्यावसायिक योजना फलदायी ठरतील. कुटुंबातील काही जबाबदाऱ्या वरिष्ठांकडून तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडा. आज तुम्हाला मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. घरापासून दूर राहून स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. सर्जनशील आणि कलात्मक क्षेत्रात वाढ होईल. सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल.
आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. तुमची मेहनत, समर्पण आणि उत्साह पाहून तुमच्या वरिष्ठांना खूप आनंद होईल. आजचा दिवस तुमच्या सर्वोत्तम दिवसांपैकी एक असू शकतो. दिवसभरात तुम्ही भविष्यासाठी चांगल्या योजना आखू शकता. संध्याकाळी दूरच्या नातेवाईकांच्या आगमनामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आज तुम्हाला नातेवाईकांकडून शुभवार्ताही ऐकायला मिळू शकते.
आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा
मकर राशीचे लोक आज कुटुंब आणि मुलांबरोबर चांगला वेळ घालवतील. सासरच्या लोकांकडूनही तुम्हाला आदर मिळेल. नफा मिळविण्यासाठी दिवसभर व्यवसायात व्यस्त राहाल. अडकलेली कामे पूर्ण होताना दिसतील. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यात व्यस्त असतील. या परीक्षांमध्ये त्यांना अपेक्षित यशही मिळेल.
आज मकर राशीचे आरोग्य
मकर राशीच्या लोकांना बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार होऊ शकतात. अनियमित खाण्याच्या शैलीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठणे आणि योगासने करणे, व्यायाम करणे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरेल. फक्त यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे.
मकर राशीसाठी आजचे उपाय
पैशांशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाण्यात गूळ आणि तूप अर्पण करा. आज हनुमान चालिसाचं पठण करा.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :