Capricorn Horoscope Today 26 June 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्रांमार्फत (Friends) नोकरीची नवीन संधी मिळेल. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. नोकरीत बढतीची संधी मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरातून बाहेर पडताना वडीलधाऱ्यांचा आशिर्वाद घेऊन बाहेर पडा. तुमची सर्व कामे पूर्ण होतील. नोकरीत (Job) पदोन्नती होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी (Business) कोणताही मोठा निर्णय अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच घ्यावा. आज सरकारी कामे पूर्ण होतील. आज गुंतवणूक (Investment) करताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका. विद्यार्थ्यांना (Students) नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी देखील मिळेल. मित्रांचं सहकार्य मोलाचं ठरेल.
आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा
आज कुटुंब आणि मुलांबरोबर चांगला वेळ घालवा. सासरच्या लोकांकडूनही आदर मिळेल. नफा मिळविण्यासाठी दिवसभर व्यवसायात व्यस्त राहाल. अडकलेली कामे पूर्ण होताना दिसतील. विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यासाकडे लक्ष देतील.
आज तुम्हाला मानसिकदृष्ट्या काही आव्हाने त्रास देतील. जोडीदाराकडून तुमची काळजी घेतली जाईल. आज तुमचे खर्च कमी होतील आणि उत्पन्न चांगले राहील. कुटुंबाचे सुख मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम राहील. आज तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून किंवा प्रेयसीकडून महत्वाच्या कामात सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत सुख-सुविधांचा आनंद घ्याल. शारीरिकदृष्ट्या तुमची तब्येत चांगली असेल, परंतु मानसिक तणाव दूर करण्यासाठी मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवा.
आज मकर राशीचे आरोग्य
मकर राशीच्या लोकांना बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार होऊ शकतात. अनियमित खाण्याच्या शैलीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठणे आणि योगासने करत राहणे फायदेशीर ठरेल.
मकर राशीसाठी आजचे उपाय
पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाण्यात गूळ आणि तूप अर्पण करा आणि हनुमान चालिसाचं पठण करा.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :