Capricorn Horoscope Today 24 June 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. तुम्ही जे काही काम करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. मित्राच्या (Friends) मदतीने तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्याचे साधन मिळेल. शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राकडून नवीन नोकरीची (Job) ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. व्यवसायातही (Business) वाढ होईल. तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याकडून पैसे घेतले असतील तर ते आज परत करा. कामावर लक्ष केंद्रित करा आणि भावनिक गोष्टी टाळा. हा दिवस तुमच्या वैवाहिक जीवनातील (Married Life) सर्वात खास दिवसांपैकी एक असू शकतो.
तुमचे दीर्घकाळ रखडलेले काम आज वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस उत्साहवर्धक राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि नियोजन राबवून लाभ मिळवू शकता. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. आज या राशीचे लोक घरगुती काम आणि गरजांवर पैसे खर्च करतील.
मकर राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
आज कुटुंबात मकर राशीच्या लोकांना घरातील वडीलधाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आजारपणामुळे घरात काहीसं चिंतेचं वातावरण असेल. वैवाहिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला कोणतीही भेटवस्तू वगैरे देऊ शकता. सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व आणि प्रभाव वाढेल. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत मजेत जाईल, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.
आज मकर राशीच्या लोकांचे आरोग्य
मकर राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील परंतु आळस मानसिकदृष्ट्या वरचढ राहील. मॉर्निंग वॉक आणि योगासने अशा वेळी फायदेशीर ठरतील.
मकर राशीसाठी आजचे उपाय
शनि मंदिरात काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करा. पिंपळाच्या झाडाला पाणी घालणे देखील फायदेशीर ठरेल.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :