Capricorn Horoscope Today 21 June 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला नोकरीत बढतीची संधी मिळेल. आज कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवसाय करणारे लोकही व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. परदेशातूनही तुम्हाला शिक्षणाच्या संधी मिळतील. आज तुम्हाला तुमच्या मित्रांकडून काही संधी मिळतील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या उत्पन्नात वाढ करू शकता. घरातील ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घेतल्यास तुमची सर्व कामे पूर्ण होतील. आज जोडीदारासाठी थोडा वेळ काढा आणि मनमोकळेपणाने संवाद साधा.
मित्रांचं सहकार्य मोलाचं ठरणार
मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खूप यशस्वी राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असणार आहे. आजच्या दिवशी मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. कुटुंबात तुमची विश्वासार्हता आणि आदर वाढल्याने आनंदी व्हाल. तुमच्यात प्रेम आणि सहकार्याची भावना कायम राहील.
मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांच्या कुटुंबात (Family) एखाद्या गोष्टीवरुन वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. घराच्या शांततेसाठी तुम्ही संयम ठेवणं गरजेचं आहे. तसेच, रागावर नियंत्रण ठेवा. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत मजेत जाईल, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. तसेच, शारीरिकदृष्ट्या योगसाधनेला महत्त्व द्या.
आज मकर राशीचे आरोग्य
मकर राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील परंतु आळस मानसिकदृष्ट्या जास्त राहील. मॉर्निंग वॉक आणि योगासने अशा वेळी फायदेशीर ठरतील.
मकर राशीसाठी आजचे उपाय
तांदूळ लाल रंगाच्या कपड्यात ठेवा आणि पाच जपमाळ 'ओम श्रीं श्रीं नम:' मंत्राचा उच्चार करुन धन ठेवलेल्या ठिकाणी ठेवा.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :