Capricorn Horoscope Today 09th March 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आजच्या दिवशी तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. पैशाशी संबंधित कोणतीही समस्या आज सुटू शकते आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो.


महत्त्वाच्या कामांना वेळ द्या


व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करतील. तसेच, तुम्ही कोणतेही निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्या. कुठेही स्वभावात चिडचिडेपणा येऊ देऊ नका. बाकी तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाईल. विनाकारण गोष्टीत वेळ वाया घालवण्यापेक्षा महत्त्वाच्या कामांना वेळ द्या. 


शारिरीकदृष्ट्या योग साधनेला महत्त्व द्या


नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. अनावश्यक खर्च करणे टाळा. तसेच, तुम्ही आधी जी काही गुंतवणूक केली असेल, त्याचा पुरेपूर फायदा होईल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. मित्र-मैत्रिणींशी रोखठोक व्यवहार करा. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचाही समतोल राखा. शारिरीकदृष्ट्या योग साधनेला महत्त्व द्या. 


आज मकर राशीचे आरोग्य :


मकर राशीच्या लोकांना मानसिक थकवा किंवा अस्वस्थता यांसारख्या समस्या जाणवू शकतात. अशा वेळी एकांतात बसून संगीत ऐकल्यामुळे तुमचा मूड बदलू शकतो.  


मकर राशीसाठी आजचे उपाय :


व्यावसायिक प्रगतीसाठी पूजागृहात हळदीची माळ लटकवा आणि कामाच्या ठिकाणी आकाशी रंग परिधान आणि लक्ष्मी नारायण मंदिरात लाडू अर्पण करा.


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 09th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य