Cancer Weekly Horoscope 1 to 7 january 2023 : जानेवारी (January 2023) पहिला आठवडा म्हणजे 1 जानेवारी 2023 ते 7 जानेवारी 2023 हा काळ कर्क (Cancer)राशीच्या लोकांसाठी कसा असणार? विवाहित जोडप्याचे मूल होण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही? आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुमच्या गुंतवणुकीतील तोटा आता नफ्यात बदलणार आहे. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमचे रखडलेल्या योजना मिळण्याची अपेक्षा आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये, तुमचे अडकलेले पैसै तुम्हाला मिळतील. जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
साप्ताहिक राशीभविष्यकर्क राशीच्या लोक सप्ताहाच्या सुरुवातीला शुभ ग्रहांच्या प्रभावाखाली राहतील. गेल्या काही दिवसांची उदासीनता आनंदात बदलेल, जी तुमच्या कृतीतून दिसून येईल. तुम्ही एखाद्या आध्यात्मिक ठिकाणी प्रवास करण्याचा निर्णय घेऊ शकता. तुम्ही गरजूंसाठी योगदान द्याल. तुमच्या धार्मिक श्रद्धा तुम्हाला योग्य मार्ग शोधण्यात मदत करू शकतात. प्रेम संबंधातील जोडपे त्यांच्या वैवाहिक जीवनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. विवाहित जोडपे नवीन बाळाच्या आगमनाची अपेक्षा करू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली कामगिरी करता येईल.
नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यताआठवड्याच्या मध्यात तुम्ही कामाच्या ठिकाणी व्यस्त असाल. तुमच्या मुख्य कामात तुम्हाला मजबूत स्थान दिसेल. तुमचे प्रकल्प आता सुरू होऊ शकतात. कामाच्या ताणामुळे काही दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही. मात्र अशा वेळी तुमचे कुटुंब आणि तुमचा जोडीदार तुम्हाला साथ देईल, यामुळे कौटुंबिक नातेसंबंधात प्रेम वाढेल. नोकरी शोधणाऱ्यांना नोकरीत यश मिळू शकते. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूश होतील; पदोन्नतीबाबत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
विवाहाबाबत महत्वाचे निर्णयआठवड्याचे शेवटचे काही दिवस तुमच्या कामाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतील. तुमची इच्छाशक्ती वाढेल, व्यवसायासाठी काही महत्वाचे निर्णय तुम्ही सहज घेऊ शकाल. व्यावहारिक ज्ञानाच्या मदतीने तुम्ही तुमच्या विरोधकांवर नियंत्रण ठेवू शकाल. मुलाच्या तब्येतीबाबत काळजी घ्या. प्रेम संबंधातील दांपत्य विवाहाबाबत काही निर्णय घेऊ शकतात. ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या