Cancer Monthly Horoscope July 2023 : जुलै 2023 महिना कर्क राशीच्या लोकांसाठी ठीक राहील. या महिन्यात तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर कोणाच्याही सल्ल्याशिवाय पैसे गुंतवू नका. तुमच्या वैवाहिक जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. या महिन्यात तुम्ही तुमच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. अनावश्यक प्रवास टाळा. एकूणच शिक्षण, प्रवास, आरोग्य, प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत मिथुन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना कसा असेल ते जाणून घेऊयात. 


या महिन्यात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग आणि ध्यान करणं फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाणार आहे. आवडत्या विषयावर अभ्यास करण्याची संधी मिळेल तसेच नवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील. 


ग्रहांचे कर्क राशी परिवर्तन


या महिन्यात 7 जुलैपर्यंत सप्तम घरात बुधाचा षडाष्टक दोष राहील, सप्तम घराशी शनीचा संबंध 2-12 असेल. त्यामुळे या महिन्यात तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. या महिन्यात कोणावरही सहजपणे विश्वास ठेवून सर्व गोष्टी शेअर करू नका. तुमचं नुकसान होऊ शकतं. या महिन्यात तुमच्या व्यवसायात देखील चांगली प्रगती होईल. मोठी ऑफर तुम्हाला मिळू शकते.


कर्क राशीचे करिअर कसे असेल?


1 जुलैपासून मंगळ दशम घरातून नववा-पंचम राजयोग आहे, ज्यामुळे तुमचा कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल. दशम घरात शनीच्या तिसर्‍या राशीमुळे तुम्हाला बॉसकडून येत्या काही दिवसांत मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. 17 ते 24 जुलै दरम्यान तुमच्या राशीमध्ये सूर्य-बुध बुधादित्य योग येत असल्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल. जुलैमध्ये सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काही चांगल्या संधी मिळू शकतात.


कर्क राशीचे वैवाहिक आणि प्रेम संबंध कसे असतील?


6 जुलैपर्यंत शुक्राची सप्तमी दृष्टी असल्यामुळे या महिन्यात तुम्हाला चांगला जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.  7 जुलैपासून सप्तम घरात शुक्राचा षडाष्टक दोष असेल, त्यामुळे वैवाहिक जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. 

कर्क राशीचे करिअर कसे असेल? 


1 जुलैपासून पाचव्या घरात मंगळाच्या चौथ्या राशीसह, या महिन्यात तुम्हाला अभ्यासासह इतर कला क्षेत्रात देखील तुमची आवड वाढेल. कला आणि साहित्यात तुमचं मन रमेल.    
बृहस्पति पाचव्या घरात षडाष्टक दोष असेल आणि चांडाळ दोष दहाव्या घरात राहील. या दरम्यान जास्त सोशल मीडियाचा वापर करू नका. अन्यथा तुमच्या डोळ्यांवर परिणाम होईल.  


कर्क राशीच्या लोकांची आरोग्य स्थिती


1 जुलैपासून आठव्या गरात मंगळाची सप्तमी दृष्टी असल्याने आरोग्याबाबत सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या महिन्यात अनावश्यक प्रवास करू नका. तसेच, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग आणि ध्यान, योगासन करण्यावर भर द्या.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Monthly Horoscope July 2023 : जुलै महिना 'या' राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक! 5 महत्त्वाच्या ग्रहांचे परिवर्तन, मासिक राशीभविष्य जाणून घ्या