Aries Monthly Horoscope july 2023 : मेष राशीत गुरु चांडाळचा अशुभ योग तयार होत आहे, त्यामुळे जुलैमध्ये या राशीच्या अडचणी वाढणार आहेत. या योगामुळे तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लागणार आहे. तुमची निर्णय क्षमता आणि तर्कशुद्धता या महिन्यात प्रभावित होऊ शकते. तुमची आर्थिक स्थितीही या महिन्यात फारशी चांगली नसणार. या महिन्यात मेष राशीच्या लोकांना कोणताही निर्णय सावधपणे घ्यावा लागेल, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. एकंदरीतच शिक्षण, प्रवास, आरोग्य, प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत मेष राशीच्या लोकांसाठी जुलै महिना कसा असेल ते जाणून घेऊयात. 


या महिन्यात आयुष्यातील कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी तुम्ही घरातील ज्येष्ठ सदस्यांचा सल्ला घेऊ शकता. जुलैमध्ये तुमची तब्येतही बिघडू शकते. म्हणूनच आपला आहार आणि दिनचर्याकडे लक्ष द्या.


ग्रहांचे मेष राशी परिवर्तन


अकराव्या घरात शनि प्रतिगामी आहे, यामुळे तुमचे चांगले काम एखाद्या मत्सरी व्यक्तीच्या लक्ष्यावर आहे, या महिन्यात व्यवसाय काळजीपूर्वक करा. 8 जुलैपासून बुधाचा सप्तम भावाशी 4-10 चा संबंध असेल, त्यामुळे जुलैमध्ये व्यावसायिकांसाठी वेळ सामान्य आहे. सप्तम घरातील गुरु ग्रहामुळे जुलै महिना तुमच्या भविष्यासाठी खूप चांगले अनुभव देणारा असेल. 25 जुलैपासून बुधाचा सप्तम घराशी 3-11 चा संबंध असेल, त्यामुळे जुलैमध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप विचारपूर्वक गुंतवणूक करणे आवश्यक आहे.


मेष राशीचे करिअर कसे असेल?


1 जुलैपासून दशम घरातून मंगळाचा षडाष्टक दोष असेल, ज्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये तुमची छोटीशीही चूक तुम्हाला महागात पडू शकते. 17 जुलैपासून दशम घरात सूर्याची सप्तमी दृष्टी असल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा उत्साह असेल. यामुळे तुमची कामे वेळेपूर्वी पूर्ण होतील. दहाव्या घराचा स्वामी शनि अकराव्या घरात स्थित आहे, त्यामुळे कामाचा ताण वाढल्याने तुम्हाला अधिक अनुभवही मिळतील. 17 ते 24 जुलै दरम्यान चतुर्थ घरात सूर्य-बुधाचा योग आहे, त्यामुळे बेरोजगार लोकांना नवीन नोकरी मिळण्याची संधी आहे. 


मेष राशीचे वैवाहिक आणि प्रेम संबंध कसे असतील?


6 जुलैनंतर राशीचा इतर घरांशी संबंध चांगला असल्या कारणाने कुटुंबात आनंदी वातावरण असेल. तुमच्या प्रत्येक कामात जोडीदाराची साथ तुम्हाला मिळेल. यामुळे तुम्ही अनेक प्रकल्प हाती घेऊ शकता. अविवाहित लोकांना देखील लवकरच शुभवार्ता ऐकायला मिळेल. 


विद्यार्थ्यांसाठी जुलै महिना कसा असेल?


16 जुलैपर्यंत सूर्याचा पंचम घराशी 3-11 चा संबंध असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. डिजीटल माध्यम तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरू शकेल. विदयार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीही हा काळ चांगला आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  


मेष राशीच्या लोकांची आरोग्य स्थिती 


1 जुलैपासून अशुभ योग असल्या कारणाने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच आरोग्याच्या काही समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल. आरोग्याची काळजी घ्या. तसेच, बदलत्या हवामानापासून स्वत:च्या तब्येतीकडे आणि आहाराकडे लक्ष द्या. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Monthly Horoscope July 2023 : जुलै महिना 'या' राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक! 5 महत्त्वाच्या ग्रहांचे परिवर्तन, मासिक राशीभविष्य जाणून घ्या