Budhaditya Rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. यामुळे अनेक राजयोग (Rajyog) निर्माण होणार आहेत. या राजयोगाचा प्रभाव सर्व 12 राशींवर होणार आहे. काही राशींसाठी हा काळ शुभ असणार आहे तर काही राशींसाठी हा काळ अशुभ असणार आहे. त्यानुसार, 29 ऑक्टोबर रोजी बुध (Mercury) ग्रहाने वृश्चिक (Scorpio Horoscope) राशीत प्रवेश केला होता. आता 16 नोव्हेंबर रोजी ग्रहांचा राजा सूर्यसुद्धा (Sun) राशी परिवर्तन करणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर सूर्य आणि बुध मिळून बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. हा राजयोग 4 राशींच्या लोकांसाठी फार शुभ मानला जाणार आहे. या राशीसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. तसेच, धनलाभाचेही योग आहेत. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Horoscope)
बुधादित्य राजयोग तूळ राशीच्या लोकांसाठी फार शुभ असणार आहे. या काळात धनलाभाचे अनेक योग आहेत. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना या काळात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वेतनात चांगली वाढ होईल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात व्यवसायात चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. तसेच, या काळात तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. अनेक काळापासून तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल.
मकर रास (Capricorn Horoscope)
बुध आणि सूर्याच्या संयोगाने मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. या काळात गुंतवणूक केलेली फायद्याची ठरेल. तसेच, भविष्यात तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशातून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
बुध आणि सूर्याच्या युतीने कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा ठरणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तसेच, नोकरी-व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल. तुमचा व्यवसाय अधिक वाढेल. तसेच, दीर्घकालीन आजारापासून तुम्ही दूर राहाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :