Continues below advertisement

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची (Samruddhi Mahamarg Accident) घटना घडली आहे. यात 2 जण जागीच ठार झाले आहेत. तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. समृद्धी महामार्गावर भरधाव पिकअप मालवाहू वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने भरधाव कारने मागून धडक (Accident) दिल्याने भीषण अपघाताची (Samruddhi Mahamarg Accidentघटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या (Washim) धनज गावाजवळ हा अपघात घडलाय.

Samruddhi Mahamarg Accident : देवदर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

Continues below advertisement

यवतमाळ येथून देवदर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा समृद्धीमहामार्गावर वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धनज गावाजवळ हा अपघात झाला आहे. भरधाव पिकअप मालवाहू वाहनाने अचानकपणे ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या भरधाव कार अनियंत्रित होऊन मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघात दोन जण जागीच ठार झालेत, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Accident : भीषण अपघाता 2 जण जागीच ठार, तर तिघे गंभीर

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघाताच्या घटनेत मंगेश नामक कारचालकाचा आणि चाळीस वर्षीय विक्रम अशोकराव सौरगपते रा. यवतमाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनुकूल मनोज यादव (वय 35 रा.दत्त चौक यवतमाळ) व मयूर दीपक डोनाडकर (वय 29 रा.दत्त चौक, यवतमाळ) हे गंभीर जखमी झाले असून दोघांना तत्काळ प्राथमिक उपचारासाठी कारंजा इथं हलविण्यात आले आहे.

हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, नवऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल

गोंदिया शहरातील गणेशनगर येथे राहणाऱ्या सरिता पराग अग्रवाल (28) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. परंतु ही आत्महत्या पती व नणंदेच्या छळाला कंटाळून केली असल्याची बाब पुढे आल्याने गोंदिया शहर पोलिसांनी तिघांवर मृत महिलेचा भाऊ प्रवीण ऊर्फ प्रदीप गुप्ता यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत मृतक महिलेच्या पती व सासूला अटक केली आहे. सरिता गुप्ता हिचा विवाह 7 जून 2023 रोजी पराग अग्रवाल (रा. गणेश अपार्टमेंट, गोंदिया) याच्याशी झाला होता.

लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सुरळीत गेले. मात्र, नंतर सासू श्रद्धा अग्रवाल व नणंद पूर्वा अग्रवाल यांनी घरकाम, वागणूक, पैशांच्या मागणीवरून सरिताचा सतत मानसिक छळ सुरू केला. पती पराग अग्रवाल हा दारू पिऊन किरकोळ कारणावरून सरिताला मारहाण करीत होता. सतत शिवीगाळ, धमकी आणि अत्याचार सुरूच असल्याने सरिताने हा प्रकार फोनवर आई व भावंडांना सांगितला होता. त्यानंतर सरिताने या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. सरिता अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात पती पराग अग्रवाल, सासू श्रद्धा अग्रवाल व नणंद पूर्वा अग्रवाल यांच्याविरुद्ध हुंडाबळी, मारहाण, छळ, संशयास्पद मृत्यू कलम 80, 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या: