Budh Uday 2024 : ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध (Mercury) सध्या मिथुन राशीत अस्त स्थितीत आहे. 2 जूनला अस्त झालेल्या बुधाचा आज 25 जूनला उदय झाला आहे. बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि वाणीचा कारक आहे, त्यामुळे बुधाच्या बदलत्या स्थितीचा परिणाम लोकांच्या आर्थिक स्थितीवर, करिअरवर आणि वाणीवर होतो.


त्यात आता होत असलेल्या बुधाच्या उदयामुळे 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळेल. या लोकांना नोकरी आणि व्यवसायात बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्न वाढल्याने त्यांची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल आणि जुन्या अडचणी दूर होतील. बुध ग्रहाचा उदय नेमका कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) फलदायी ठरेल? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


बुधाचा उदयामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या सोनेरी दिवसांना सुरूवात होईल. तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढेल. तुम्हाला तुमच्या कामाचं चांगलं फळ मिळेल. जुन्या अडचणी संपुष्टात येतील. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या शब्दांच्या जोरावर तुमचं काम पूर्ण होईल. कुटुंबात सुरू असलेल्या अडचणीही दूर होतील. नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. बँक बॅलन्स वाढेल. 


सिंह रास (Leo)


करिअरमध्ये दीर्घकाळ चालणारे चढ-उतार आता स्थिर होतील. काहींसाठी हा काळ खूप फायदेशीर असणार आहे. तरी, काही लोक स्वतःचं नुकसान करू शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक पुढे जा. तुमच्या ध्येयांवर लक्ष ठेवा. तुम्हाला आर्थिक लाभ होईल आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. काही महत्त्वाची कामं पूर्ण होऊ शकतात. विशेषतः व्यवसायासाठी हा काळ चांगला आहे, बुधाच्या कृपेने व्यवसायात वाढ होईल आणि नफाही मिळेल. कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. 


मकर रास (Capricorn)


बुधाचा उदय मकर राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तुमची सर्व कामं, ज्याबद्दल तुम्ही बराच काळ चिंतेत होता, ती आता सहज पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ प्रगतीचा आहे, तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुमचा पगार वाढेल. काही लोकांना लवकरच परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात लाभ होईल, एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. वैयक्तिक जीवनासाठीही वेळ शुभ आहे. तुमची लव्ह लाईफ, वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदारावरील प्रेम वाढेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Weekly Horoscope 24 June To 30 June 2024 : जूनचा शेवटचा आठवडा सुरू; अनेक राजयोगांमुळे 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, लक्ष्मीच्या रुपात येणार बक्कळ पैसा, आरोग्यही राहील उत्तम